Banana Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: गोव्यात केळींचे 29531 टन उत्पादन! 2495 हेक्टर जमीन लागवडीखाली; सत्तरी, केपेत अधिक उत्पादन

Goa Banana Production: राज्यात मोठ्या प्रमाणात सालदाटी, वेलची, भाजीची केळी तसेच आता केरळी केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते; परंतु प्रामुख्याने सालदाटी आणि वेलची केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केळी हे बारामाही येणारे पीक आहे. त्यासोबतच आंतरपिकात तसेच बागायतींमध्ये लागवडीसाठी अतिशय योग्य असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेण्यात येते. केळी हे पारंपरिक तसेच मोठ्या प्रमाणात मागणी असणारे हे पीक असल्याने राज्यातील २,४९५ हेक्टर जमीन केळी लागवडीखाली असून २९,५३१ टन उत्पादन वर्षाला घेण्यात येत असल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात सालदाटी, वेलची, भाजीची केळी तसेच आता केरळी केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते; परंतु प्रामुख्याने सालदाटी आणि वेलची केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सत्तरी आणि केपे तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

राज्यात सर्वाधिक ५२८ हेक्टर क्षेत्रफळात केळीची लागवड ही केपे तालुक्यात होत असून येथे एकूण ५,८५७ टन इतके केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते, तर सर्वात कमी २५ हेक्टर क्षेत्रफळात लागवड ही मुरगाव तालुक्यात केली जात असून येथे केवळ ३२६ टन इतके उत्पादन घेण्यात येते.

केळी लागवड व उत्पादन

उत्तर गोवा

क्षेत्रफळ - ९९२ हेक्टर

उत्पादन - ११,९८२ टन

दक्षिण गोवा

क्षेत्रफळ - १,५०३ हेक्टर

उत्पादन -१७,५४९ टन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT