DB Stock scam
आसाममधील ऑनलाइन ट्रेडिंग घोटाळ्यातील मुख्य आरोपी दीपंकर बर्मन याला गुवाहाटी पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. आसामचे पोलीस महासंचालक (DGP) जीपी सिंग यांनी या अटकेला दुजोरा दिला. रविवारी त्याला 2 कोटी 70 लाख रुपयांसह पकडण्यात आले.
कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन ट्रेडिंग घोटाळा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उघड झाला. बर्मनच्या कंपनीत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. परंतु त्यांना वचन दिलेले परतावा मिळालेला नाही आणि कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.
बर्मनला गोवा न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांडवर गुवाहाटीला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑनलाइन ट्रेडिंग घोटाळ्यात सहभागी असलेल्या 65 हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, ज्यात अशाच प्रकारचे घोटाळे करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी बर्मनच्या पालकांनाही अटक करण्यात आली होती.
या घोटाळ्यात आसामी अभिनेत्री सुमी बोराह आणि तिचा फोटोग्राफर पती तारिक बोराह यांचाही सहभाग असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने या घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या 41 गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20-30 वयोगटातील तरुण-तरुणींनी जाहिरात केलेल्या या कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळेल, असे सांगून राज्यभरातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते.
या प्रकरणात बऱ्याच दिवसांपासून फरार असणारा दिपंकर बर्मनची अटक हे मोठे यश मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.