Dinesh Gundu Rao on goa congress rebel  Dainik Gomantak
गोवा

Dinesh Gundu Rao : फुटीर आमदारांना प्रत्येकी 40 कोटी!

जनता शिकवेल धडा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या राजकारणात बेसुमार पैशांचा वापर केला जात आहे. काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी भाजपने प्रत्येकी 40कोटी रुपये दिलेत, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. ‘पक्षांतराचे एकही कारण नसताना त्यांनी हा निर्णय घेतला. आमच्या आमदारांनी पक्षांतर केल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने मी गोमंतकीयांची माफी मागतो,’ अशी प्रतिक्रिया गुंडू राव यांनी आज दिली.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन व इतर मान्यवर उपस्थित होते. ‘जनतेचा विश्‍वासघात करून आमदारांनी मोठा गुन्हा केला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी देवापुढे घेतलेली शपथ आणि पाच वर्षे काँग्रेससोबत राहणार असल्याच्या प्रतिज्ञापत्रावर विश्‍वास ठेऊन लोकांनी त्यांना मतदान केले. त्यांनी जनतेशी दगाफटका केला असून मतदार त्यांना योग्य धडा शिकवतील, असेही गुंडू राव म्हणाले.

तपास यंत्रणांची भीती

आमदार फोडण्यासाठी पैशांच्या व्यतिरिक्त तपास यंत्रणांचा वापर देखील केला गेला. हे सोडल्यास पक्षांतर करण्याचे दुसरे कोणतेच कारण दिसत नाही. काही जण म्हणतात की विकासासाठी गेले आहे. विरोधात राहून विकास करता येत नाही, ही गोष्ट चुकीची आहे. या आठ जणांनी मतदारांचा विश्‍वासघात केला आहे, अशी टीका गुंडू राव यांनी केली.

‘भारत जोडो’मुळे भाजप बिथरला

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेमुळे बिथरलेल्या भाजपने ही फूट घडवली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी विरोधकांना संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच गोव्यातील आमदारांना पक्षात सामावून घेण्यात आले आहे. याचा भाजपला निश्‍चित फटका बसेल, असा दावा गुंडू राव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire : गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT