CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Digital Payment : महत्वाची बातमी ! राज्य सरकारचा ‘पेटीएम’शी करार, आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यावर भर

मुख्यमंत्री : डिजिटल पेमेंटमार्फत पैसे स्वीकारणार; ‘पेटीएम’बरोबर करार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यातील आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यावर भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून सरकारच्या अर्थ विभागाने आज गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत ‘पेटीएम’शी सामंजस्य करार केला.

हा करार सामान्यांसाठी फायदेशीर ठरेल आणि राज्यातील सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस बनतील, असा विश्‍‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी सरकारच्या वतीने प्रणव भट आणि पेटीएमचे मुख्य व्यवसाय अधिकारी अभय शर्मा, उपाध्यक्ष अंकित गोयल, सौरभ अग्रवाल, वेदांत कर्नानी आणि अभिनव दुबे उपस्थित होते.

‘पेटीएम’ ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीद्वारे यापुढे राज्यातील सरकारशी निगडित आर्थिक व्यवहार चालतील. या करारानुसार डिजिटल पेमेंट, वित्तीय सेवांमध्ये वाढ आणि सुलभता येईल.

कंपनी ग्राहकांना मोबाइल पेमेंट सेवा देईल. शिवाय व्यापाऱ्यांना क्यूआर कोड, पॉईंट ऑफ सेल आणि ऑनलाईन पेमेंट गेटवे ऑफरिंगद्वारे पेमेंट प्राप्त होईल.

सामंजस्य करारातील ठळक मुद्दे

कंपनी सरकारी विभागांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम करेल. क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि पॉईंट ऑफ सेल उपकरणांद्वारे पेमेंट.

कंपनी गोव्याला पेटीएम ॲॅप्लिकेशनवर ई-गव्हर्नमेंट सेवा प्रदान करण्याचा पर्याय देईल, जे सर्व पेटीएम वापरकर्त्यांना जलद आणि ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध असेल.

कंपनी गोवा पोलिस कर्मचाऱ्यांचे सायबर सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करू शकते तसेच नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा जागरूकता पसरवण्यासाठी गोव्यासोबत संयुक्त मोहीम आयोजित करू शकते.

आम्ही अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्याच्या प्रयत्नात आहोत. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाची ही पूर्ती आहे. याचा सामान्य माणसांना फायदा होईल. ही यंत्रणा सर्वत्र उपलब्ध असल्याने नागरिक वीज, पाणी यासारखी बिले पेटीएमद्वारे भरू शकतील.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT