Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'द्वारे 35.90 लाखांची फसवणूक; सायबर गुन्हे पोलिसांकडून संशयिताला बंगळुरूतून अटक

Goa Cyber Crime Police: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून मडगाव येथील महिलेची तब्बल ३५ लाख ९० हजार २०० रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे पोलिसांनी बंगळुरू येथून मोहनकुमार जी. (२५) याला अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून मडगाव येथील महिलेची तब्बल ३५ लाख ९० हजार २०० रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे पोलिसांनी बंगळुरू येथून मोहनकुमार जी. (२५) याला अटक केली.

२२ जुलैपूर्वी तक्रारदार महिलेला व्हॉट्सॲप कॉल करून संशयिताने अंधेरी पोलिस ठाण्याचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. महिलेचे बँक खाते दहशतवादी कारवायांशी जोडले असल्याचा बनाव करून गंभीर कायदेशीर कारवाईची धमकी दिली. या प्रकरणातून सुटका करून देण्याच्या बहाण्याने दबाव आणत वेगवेगळ्या बँक खात्यांत ‘आरटीजीएस’द्वारे ३५,९०,२०० रुपये जमा करण्यास भाग पाडले.

महिलेच्या तक्रारीवरून २१ ऑगस्ट रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तांत्रिक तपासात संशयित बंगळुरू येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांच्या पथकाने छापा टाकून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

संशयिताच्या बँक खात्यात मोठी रक्कम

तपासातील माहितीनुसार, ६ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संशयिताच्या बँक खात्यात फसवणुकीच्या रकमेपैकी ९.८ लाख रुपये जमा झाले होते. अटक केलेल्या संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अनुष्का पै बीर करीत असून, सायबर गुन्हे पोलिस अधीक्षक राजू देसाई व पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT