Goa Road  Dainik Gomantak
गोवा

Dangerous Roads in Goa: वीज वाहिन्यांसाठी खोदकाम; मांद्रेत रस्ते बनले धोकादायक

खड्डे नीट न बुजविल्याने अपघातांना निमंत्रण; धुळीचे साम्राज्य

गोमन्तक डिजिटल टीम

Dangerous Roads in Goa: मोरजी : वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सध्या सरकारकडून पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे येथील रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत.

खोदकाम केलेले रस्ते व्यवस्थित बुजवले जात नसल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. शिवाय धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे जीवीतहानी होण्याचा धोका असून याकडे तत्काळ लक्ष द्यावे. खोदकाम केलेले रस्त्यांचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वीज खात्यामार्फत अंडरग्राउंड केबलसाठी सध्या मांद्रे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. एखाद्या परिसरात खोदकामानंतर केबल घालून 24 तासात खड्डा बुजवणे बंधनकारक असताना काही ठिकाणी पंधरा-पंधरा दिवस खोदकाम तसेच ठेवले जाते. तूये आयटीआय परिसरात तूये वीज विभागाच्या उपकेंद्रासमोर मांद्रे या ठिकाणी अजूनही खोदकाम तसेच ठेवले आहे.

मांद्रे आसकावाडा येथे एका दुचाकीस्वार महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर पंचायतीने घटनास्थळी भेट देऊन आठवड्यात रस्ते पुर्ववत न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मांद्रे सरपंच सावंत यांनी दिला होता. अपघाताची ही मालिका सरकारने बंद करण्यासाठी व्यवस्थित रस्ते बुजवण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावे अशी मागणी केली जात आहे.

अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाही किंवा धोका देणारी सूचना नाही. तुये आयटीआय परिसरात खोदकामाच्या येथील फलक रात्री दिसत नाही. कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या ठिकाणी रिफ्लेक्ट टेप लावाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT