Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : दिल्लीला गेलोच नाही; दिगंबर कामत खोटं का बोलले?

काँग्रेसमधील फुटीर गट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीने जोर पकडला आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून कामत सोमवारी दिल्लीला जाऊन आल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : सोमवारी आपण दिल्लीला गेलोच नव्हतो, अशा आशयाचे विधान काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी केल्यानंतर येथील वृत्तवाहिन्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका वाहिनीने तर कामत ज्या विमानाने दिल्लीला गेले, त्या विमानाचा बोर्डिग पासही दाखवून कामत खोटे बोलत असल्याचा आरोप केला. या आठवड्यात काँग्रेसमधील फुटीर गट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीने जोर पकडला आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून कामत सोमवारी दिल्लीला जाऊन आल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली होती.

परंतु मंगळवारी सकाळी दिगंबर कामत यांनी तो मी नव्हेच, अशा आशयाचा खुलासा केला. गेले दोन महिने कामत विविध कारणांसाठी दिल्लीला गेले. परंतु पत्रकारांना त्यांच्या या भेटीचा संबंध काँग्रेस पक्षातील बंडखोरीशी लावला, तेव्हा आपण मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो, किंवा अन्य बिगर राजकीय कारणासाठी गेलो होतो, असे सांगून त्यांनी पत्रकारांवर आरोप करण्यास कमी केले नव्हते.

कामत दिल्लीला गेल्याचे वृत्त सर्वप्रथम काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर एका वाहिनीने तर त्यांचा बोर्डिंग पास प्रसिद्ध केला. कामत काल रात्री विस्ताराच्या विमानाने 9 वाजता गोव्यात पोचले, त्यावेळी काही पत्रकार त्यांचे चित्रिकरण करण्यासाठी थांबले होते. परंतु कामत त्यांना बगल देऊन निघून गेले. कामत जर खरोखरच दिल्लीला गेले असतील तर ते ताकाला जाऊन भांडे का लपवतात, असा प्रश्‍न निर्माण होतो. कामत फुटीर असल्याचा आरोप करून काँग्रेस पक्षाने यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई केली आहे, त्यामुळे ‘न इधर का न उधर का’ अशी त्यांची स्थिती यापूर्वीच बनली आहे.

काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीला

मंगळवारी केदार नाईक यांच्यासह काही बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला भेट दिली. भाजपच्या ज्येष्ठ सूत्रांनी सांगितले, दिवसा-उजेडी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी अशा उचापती घडत नसतात. त्यासाठी बंडखोरांना सभापतींचे कार्यालय गाठावे लागते. मागच्यावेळी काँग्रेसचे दहा आमदार फुटले, तेव्हा ते अगोदर सतीश धोंड यांच्या घरी गेले व नंतर त्यांनी सभापतींचे चेंबर गाठले. पत्रकारांना सभापतींच्या चेंबरमध्येच ही गोष्ट समजली. सध्या ज्या उघडपणे पक्ष फोडण्याचा प्रयत्न चालला आहे, तो गैरव्यवस्थापनाचाच प्रकार असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ सदस्याने बोलून दाखविले.

राजकीय घडामोडीची शक्यता कमी

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पितृपक्ष लागण्यापूर्वी गोव्यात राजकीय घडामोड घडण्याची शक्यता कमीच आहे. विश्‍वजीत राणेसुद्धा गोव्याबाहेर आहेत. राजकीय उलथापालथ घडत असताना ते राज्याबाहेर गेलेच नसते, अशी प्रतिक्रिया या नेत्याने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

SCROLL FOR NEXT