Congress party rally in Goa Dainik Gomantak
गोवा

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Digambar Kamat Criticizes Congress: सभेसाठी मोठी जागा मिळवता न येणे हे काँग्रेसचे अपयश असून, ते लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासारख्या बड्या नेत्याची सभा वाहनतळाच्या जागेत आयोजित करण्याची वेळ येणे, ही काँग्रेससाठी नामुष्कीची बाब आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केली.

सभेसाठी मोठी जागा मिळवता न येणे हे काँग्रेसचे अपयश असून, ते लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत कामत बोलत होते. राहुल गांधी यांच्या सभेसाठी लोहिया मैदान आणि कॉस्ता ग्राऊंड उपलब्ध न होण्यामागे आपला हात असल्याचा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.

कॉस्ता ग्राऊंड हे आपल्या मालकीचे नाही. तसेच लोहिया मैदानाची मालकी मडगाव पालिकेकडे असली, तरी ती आपली वैयक्तिक मालमत्ता नाही. काँग्रेसने सभेसाठी अर्ज करण्यापूर्वी अन्य कोणीतरी मैदान आरक्षित केले असण्याची शक्यता आहे असे सांगून कामत यांनी काही महिन्यांपूर्वी सरकारी अन्न महोत्सवासाठीही कॉस्ता मैदान नाकारण्यात आले होते, याची आठवण करून दिली.

धमक्या देणे हा माझा स्वभाव नाही

काँग्रेसला रॅलीसाठी पुरेशा लोकांना एकत्र आणता आले नाही, हेही त्या पक्षाचे अपयश आहे. आपण कोणालाही रॅलीत सहभागी न होण्यासाठी धमक्या दिलेल्या नाहीत. धमक्या देणे हा आपला स्वभाव नाही. तसे असते तर मडगावकरांनी आपल्याला आठ वेळा निवडून दिले नसते, असे कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT