Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

कुठे आहे,‘नशा मुक्त गोवा’; दिगंबर कामत यांचा सवाल

सरकारवर टीकास्त्र : युरी, विजय, दिगंबर, लोबोंचा सवाल

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात ‘नशा मुक्त गोवा’ असा उल्लेख केला. तोच धागा पकडून विरोधकांनी राज्यात ड्रग्ज व्यवहाराचे जाळे विणल्याचे मागील छाप्यांतून दिसत असल्याचे नमूद केले. विरोधी आमदार दिगंबर कामत, युरी आलेमाव, मायकल लोबो आणि विजय सरदेसाई यांनी कुठे आहे,नशामुक्त गोवा असा सवाल करून राज्यपालांच्या वक्तव्यावर उपहास व्यक्त केला.

(Digambar Kamat criticized the government)

राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना सुरुवातीला युरी आलेमाव यांनी दाबोळी विमानतळाविषयी राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली. त्यांनी राज्य सरकारने राबविलेल्या सरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण गोवा योजनांचा व नशामुक्त गोवा अशा केलेल्या उल्लेखावर मत व्यक्त केले. त्यांनी राज्यात अंमली पदार्थाचे जाळे विस्तारले आहे. अंमलीपदार्थ विक्री व्यवहाराच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे, ते मागील छाप्यांवरून दिसून येते. त्यामुळे खरोखरच सुरक्षित गोवा उरला आहे का? असा सवालही त्यांनी केला. आमदार विजय सरदेसाई यांनीही ‘नशा मुक्त गोवा’वरून सरकारला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला.

आमदार कामत यांनी 2021 मध्ये राज्यपालांनी नशा मुक्त गोवा करण्याचे जाहीर केले होते, याचे स्मरण त्यांनी सभागृहात करून दिले. तोच उपक्रम आताही राबविला जात असल्याचे सांंगितले. मात्र सध्या अंमलीपदार्थ शालेय विद्यार्थ्यांपर्यंतही पोहचला आहे, शितपेयातूनही अंमलीपदार्थ दिला जाऊ शकतो, असेही त्यांनी सूचित केले.

आमदार मायकल लोबो यांनीही अमली पदार्थ विक्री व्यवहार थांबविण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याशिवाय म्हापशात एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. परंतु त्याला सोडून दिले आहे, हे त्यांनी नमूद केले. पोलिस अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांना सोडून देतात आणि खरेदी करणाऱ्यांना पकडतात, हेही त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

अंमलीपदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत : आमदार दिगंबर कामत म्हणाले की, अंमली पदार्थ यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसत होते. पण आता हा व्यवहार शालेय विद्यार्थ्यांपर्यंतही ते पोहोचला आहे, असे मागील घटनांतून दिसून आले आहे. एखादे शितपेय मागविल्यास त्या शितपेयाची बाटलीही समोरच उघडण्यास सांगायला हवे,अन्यथा काहीही शितपेयात कुणीही टाकू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT