Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Five Minor Girls Assaulted Goa : डिचोलीत साडेतीन महिन्यांत 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी, तीन प्रकरणांत राज्याबाहेरील युवकांचा हात

Minor Girls Abuse Bicholim: अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढल्याने डिचोलीत खळबळ उडाली असून, नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली : अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढल्याने डिचोलीत खळबळ उडाली असून, नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या साडेतीन महिन्यांत एका सात वर्षीय बालिकेवर मिळून डिचोलीतील विविध भागांमधील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक प्रकरणे समोर आली आहेत. पैकी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

पाचपैकी तीन प्रकरणांत राज्याबाहेरील संशयित युवकांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. पाचही प्रकरणांचा छडा लावण्यात डिचोली पोलिसांना यश आले असून, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला अटक केली आहे.

जून महिन्यात लाडफे येथून मूळ झारखंड येथील एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले होते. याप्रकरणी पोलिसांनी मूळ झारखंड येथील सोसो मुर्मू या युवकाला अटक केली.

जून महिन्यातच कारापूर-साखळी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन खोलकर या २२ वर्षीय युवकाला अटक केली.

१३ सप्टेंबर रोजी मूळ कर्नाटक येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कुडचिरे येथून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले होते. याप्रकरणी पोलिसांनी कणकवली (सिंधुदुर्ग) येथील एका १९ वर्षीय युवकाच्या मुसक्या आवळल्या होत्या.

आठ दिवसांपूर्वी कुडचिरे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी लाखेरे येथील लोकेश झोरे या २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT