Goa Dhyan Foundation Dainik Gomantak
गोवा

Dhyan Foundation गुरांसाठी वरदान! गोव्यातील भटक्‍या गुरांचा आधारस्तंभ

Dhyan Foundation: संस्थेतर्फे जखमी गुरांवर उपचार करण्यासाठी शिरवई येथे खास दवाखाना उभारण्‍यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Quepem Dhyan Foundation: राज्यात भटक्‍या गुरांची संख्‍या वाढली आहे. ही गुरे भररस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. त्‍यात या मुक्‍या जनावरांसह अनेक वाहनचालक गंभीर जखमी होण्‍याबरोबरच कित्‍येकांना प्राणही गमवावे लागत आहे. यावर उपाययोजना काढण्‍यासाठी सरकारचे प्रयत्‍न सुरू आहेत.

भटक्या गुरांना वाचविण्यासाठीही सरकारने योजना चालिस लावल्या आहेत. त्‍याचाच एक भाग म्हणून दिल्लीस्थित ‘ध्यान फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे गोशाळा चालवून भटक्‍या गुरांना आसरा दिला जातो. आजपर्यंतचे त्‍यांचे काम पाहिल्यास ते उत्तम कामगिरी करीत असल्याचे दिसून येते.

केपे तालुक्यात ‘ध्यान फाऊंडेशन’च्या दोन गोशाळा एक जांबावली व दुसरी किटल-फातर्पा येथे आहे. या संस्थेतर्फे जखमी गुरांवर उपचार करण्यासाठी शिरवई येथे खास दवाखाना उभारण्‍यात आला आहे.

ध्यान फाऊंडेशनच्या राज्य समन्वयक स्वाती शिलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केपे तालुक्यातील या दोन्ही गोशाळांत सुमारे एक हजार गुरे असून त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी कामगारांची नेमणूक करण्‍यात आली आहे. दक्षिण गोव्यातून भटक्या गुरांविषयी तक्रारी आल्यास लगेच गुरांना वाहनात घालून आम्ही किटल किंवा जांबावली येथील गोशाळेत आणतो.

भटकी गुरे रात्रीच्या वेळी भर रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने बऱ्याच वेळा अपघातात घडतात. त्‍यामुळे गुरे गंभीर जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडतात, असे शिलकर यांनी सांगितले.

गुरांची चोरी करून कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी त्यांच्या तावडीतून जनावरांची सुटका करण्‍यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्‍न करतात. ‘ध्यान फाऊंडेशन’ जखमी गुरांचे प्राण वाचविण्‍यास प्रथम प्राधान्‍य देते. देशभरात ध्यान फाऊंडेशनच्या अनेक गोशाळा असून त्‍यात सुमारे 50 हजार गुरे आहेत.

राजस्‍थानी समाजाचे चांगले योगदान: दक्षिण गोव्यात असलेल्या दोन्ही गोशाळांना सरकारकडून निधी उपलब्ध होत असतो. तसेच अनेक सामाजिक संस्थांकडूनही वेळोवेळी मदत केली जाते. सध्या ध्‍यान फाऊंडेशनकडे तीन वाहने असून, ती जुनी झाली आहेत.

जांबावली येथे असलेल्या गोशाळेला राजस्थानी समाजाचे चांगले योगदान लाभत आहे.त्यांनी जनावरांसाठी नवीन शेड बांधून दिली असून वेळोवेळी जनावरांना अन्नही पुरवित आहेत. ध्यान फाऊंडेशन भटक्या जनावरांसाठी एक वरदान ठरले असून कुठेही जखमी गुरे दृष्टीस पडल्यास किंवा त्‍यांचा जीव धोक्‍यात आल्‍यास त्‍यांच्‍या सुटकेसाठी पावले उचलली जातात.

स्वाती शिलकर, ध्यान फाऊंडेशनच्या राज्य समन्वयक-

केपे तालुक्यात ‘ध्यान फाऊंडेशन’च्या दोन गोशाळा आहेत. त्‍यातील एक जांबावली येथे तर दुसरी किटल-फातर्पा येथे आहे. संस्थेतर्फे जखमी गुरांवर उपचार करण्यासाठी शिरवई येथे खास दवाखाना उभारण्‍यात आला आहे. या दोन्ही गोशाळांत सुमारे एक हजार गुरे असून त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी कामगारांची नेमणूक करण्‍यात आली आहे. गुरांबाबत तक्रारी आल्यास लगेच आम्‍ही त्‍यांना वाहनात घालून गोशाळेत आणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT