I-League Football Tournament Dainik Gomantak
गोवा

I-League Football Tournament: धेंपो क्लबची विजयामुळे स्थिती सुधारली

द्वितीय विभाग आय-लीग ः अंबरनाथ युनायटेडवर 2-1 फरकाने मात

गोमन्तक डिजिटल टीम

I-League Football Tournament धेंपो स्पोर्टस क्लबने रविवारी अंबरनाथ युनायटेड अटलांटा संघावर 2-1 असा चमकदार विजय नोंदवून द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील स्थिती सुधारली. सामना एला-जुने गोवे येथील धेंपो फुटबॉल अकादमी मैदानावर झाला.

पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीवरून गोवा प्रोफेशनल लीग विजेत्या धेंपो क्लबने उत्तरार्धात जोरदार मुसंडी मारत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. ॲश्ली कोळी याने 17 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे अंबरनाथ युनायटेडने आघाडी प्राप्त केली.

उत्तरार्धात नऊ मिनिटांत दोन गोल नोंदवून वर्चस्व प्रस्थापित केले. शालम पिरीस याने 51 व्या मिनिटास, तर नेसियो फर्नांडिसने 60 व्या मिनिटास नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे धेंपो क्लबने आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवली.

धेंपो क्लबचे आता चार सामन्यांतून आठ गुण झाले असून ड गटात अव्वल असलेल्या एआरए एफसी संघाला त्यांनी गाठले आहे. गोलसरासरीत आता गोव्यातील संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंबरनाथ युनायटेडचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. त्यामुळे ते पाच गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT