पडणे: गोव्यात होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवाला रविवारी सरकारी मान्यता मिळाली आणि यानंतर यंदाच्या वर्षी २८ ते ३० डिसेंबर पर्यंत गोव्यात सनबर्नचे आयोजन केले जाणार आहे, मात्र याच वादाला धरून सोमवारी (दि.२ डिसेंबर) धारगळ पंचायतीची पाक्षिक बैठक भरली. या बैठकीत सनबर्न व्हावा की नाही यावर दोन्ही गटांकडून चर्चा केली जातेय. सोमवारी होणाऱ्या पंचायतीच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील दिशा ठरेल असे वक्तव्य सरपंच सतीश धुमाळ यांनी केले होते.
एका बाजूला पंच अर्जून कांदोळकर हे पूर्णपणे सनबर्नच्या पक्षात आहेत, तर दुसऱ्या बाजूला पंच भूषण नाईक हे सनबर्नला पूर्णपणे विरोध दर्शविताना दिसले. "आम्ही सनबर्नला कायम विरोधच करणार आहोत, जरी आम्ही भाजपला पाठिंबा दिला तरीही आम्हाला पेडण्यात सनबर्न नकोय" असं थेट वक्तव्य त्यांनी पत्रकारांसमोर मांडलं. पंचायतीच्या सुरु असलेल्या बैठकीत सध्या ५ विरुद्ध ४ असं चित्र पाहायला मिळतंय.
सनबर्नवरून सुरु असलेल्या वादात भाजप कार्यकर्ते गिरीश कामत यांनी सनबर्नच्या समर्थकांना सवाल केला, त्यांच्या मते जे लोकं सनबर्न महोत्सवाला समर्थन करतात ते आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला जाणार आहेत का?
"आपण स्वतः जर का अशा संगीत महोत्सवांना जाणार नसू तर मग समजला बिघडवण्याचं काम कशाला?" असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सनबर्न संगीत महोत्सवाला धारगळ वासियांचा कडक विरोध दिसून येत आहे. पंच अनिकेत साळगावकर यांनी देखील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या संगीत महोत्सवाला विरोध दर्शवत "आमदारांनी सांगितल्याप्रमाणे जर परवानगी दिली तर पंचायतीत घुसणार म्हणजे घुसणार" असे धमकीवजा आवाहन दिले, त्यामुळे आता पंचायतीच्या बैठकीचा अंतिम निर्णय काय होईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.