मोरजी: पेडणे मतदारसंघात पर्यायाने धारगळ पंचायत क्षेत्रात होऊ घातलेले सनबर्न फेस्टिव्हल कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. वेळप्रसंगी लोकांसमवेत रस्त्यावर उतरू, असा इशारा पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी दिला.
मालपे येथे आपल्या कार्यालयात बुधवार, १३ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आर्लेकर बोलत होते.
यावेळी मोपाचे सरपंच सुबोध महाले, धारगळचे माजी सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, धारगळचे माजी सरपंच तथा पंचसदस्य अनिकेत साळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, शिक्षक देवानंद गावडे, उद्योजक न्हानू हरमलकर आदी उपस्थित होते.
ज्यावेळी आपल्याला ‘सनबर्न’ हे धारगळ पंचायत क्षेत्रात होऊ घातल्याबाबत अनेकांनी फोन करून विचारणा केली, त्यावेळी पर्यटनमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी याविषयी आपल्याला पूर्वकल्पना दिलेली नाही, असे लोकांना सांगितले. आपण लोकांबरोबर असणार आहे. लोकांना जे हवे तेच आपण देण्याचा प्रयत्न करीन.पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर
दक्षिणेतही झाला होता विरोध
वागातोर येथून सनबर्नची जागा बदलून दक्षिणेत हालवण्याबाबत वृत्त समोर आल्यानंतर दक्षिण गोव्यातून कडाडून विरोध झाला. दक्षिण गोव्यातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन याला महोत्सव दक्षिण गोव्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. राजकीय नेत्यांनी देखील याविरोधात मते मांडत सनबर्नला हद्दपार करण्याची मागणी केली.
दरम्यान, त्यानंतर आता पेडण्यात सनबर्न होणार अशी माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले आहे. गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे पेडण्यात महोत्सव घेण्याबाबत हालचाली सुरु होत्या. अखेर, वागातोर येथे तीन दिवसीय सनबर्न पार पडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.