Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Death: गोव्यात कार-ट्रकची भीषण धडक; बंगळुरूतील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, मेहुणी बचावली

Dharbandora Car Truck Accident: बंगळुरूहून गोव्याला आलेल्या कारची बेळगावकडे निघालेल्या ट्रकशी जोरदार टक्कर झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: बंगळुरू (कर्नाटक) येथून मेहुणीला गोव्यात झुआरीनगर येथे पोचवण्यासाठी आलेले भावोजी आणि बहिणीचा मोले - उसगाव महामार्गावरील दुर्गिणी - धारबांदोडा येथे ट्रक व कार यांच्यातील भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमधील पती-पत्नी ठार झाली, तर मेहुणी किरकोळ दुखापतींवर बचावली.

हा अपघात आज सकाळी दीडच्या सुमारास झाला. बंगळुरूहून गोव्याला आलेल्या कारची बेळगावकडे निघालेल्या ट्रकशी जोरदार टक्कर झाली. या अपघातात बंगळुरू-कर्नाटक येथील सौमन पॉल (वय ५३ वर्षे) आणि सिंधू मूर्ती (वय ४८ वर्षेे) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. तर सौमनची मेहुणी सीमा रमेश सी.के. (वय ५३ वर्षे) आणि ट्रकचालक नागराज बजंत्री ही दोघे किरकोळ जखमी झाले.

त्यांना इस्पितळातील उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सौमन पॉल हा मेहुणी सीमा रमेश हिला बिर्ला - झुआरीनगर येथील तिच्या घरी पोचवण्यासाठी गोव्यात आला होता. सौमन हा कार चालवत होता तर पत्नी सिंधू मूर्ती ही कारमध्ये पुढील सीटवर बसली होती. सीमा रमेश मागील सीटवर बसली होती. सीमा हिच्या घरी पोचण्यासाठी केवळ पाऊणतासाचे अंतर शिल्लक असतानाच हा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर रस्त्यावरील इतर प्रवाशांनी आपली वाहने थांबवून मदतकार्य केले. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fraud Case: इन्स्टाग्रामवर श्रीमंतीचा थाट, बोलण्यात प्रेम अन् लग्नाचं स्वप्नं! 23 वर्षीय तरुणाकडून 20 महिला कॉन्स्टेबलची फसवणूक; सर्व पीडित एकाच बॅचमधील

Mandovi River Pollution: मांडवी नदीच्या प्रदूषणाला कॅसिनो जबाबदार असल्याचे पुरावे नाहीत; सांडपाणी वाहिन्यांकडे संशयाची सुई

Horoscope: आजचे राशिभविष्य; धनु, कुंभसह 3 राशींच्या नशिबाला मिळणार नवी कलाटणी; वृषभ-कर्क राशींनी जपून राहा!

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

SCROLL FOR NEXT