MLA Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

Pravin Arlekar: 'मोपा' स्थलांतरीत कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये देणार; आमदार आर्लेकरांची घोषणा

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्‍पासाठी स्थलांतर करण्यात आलेल्या धनगर कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये देणार असल्याची घोषणा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली. पुढील काहीच दिवसांत ही रक्कम कुटुंबातील घर नावावर असलेल्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Pravin Arlekar Mopa Airport Project Affected Dhangar Families to Receive Rs 5 Lakh

मोरजी: मोपा विमानतळ प्रकल्‍पासाठी स्थलांतर करण्यात आलेल्या धनगर कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये देणार असल्याची घोषणा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली. पुढील काहीच दिवसांत ही रक्कम कुटुंबातील घर नावावर असलेल्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा होईल, असेही त्‍यांनी कासारवर्णे येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहे. राज्य आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. आता तरी धनगर समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री आणि धनगर समजाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. पेडणे तालुक्यातील धनगर समाजातील युवकांना सरकारी नोकरी मिळवून देणारे पहिले आमदार प्रवीण आर्लेकर ठरले आहेत. या आधी एकाही आमदाराने या समाजातील युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नव्‍हते, असे संघटनेचे अध्यक्ष बाळू शिंदे यांनी सांगून त्‍यांचे अभिनंदन केले.

यावेळी गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सचिव विठोबा खरात, खजिनदार सुनील जांगळी, उपाध्यक्ष बाबू रेकडो, बया वरक, सहसचिव जानू वरक, सदस्य भरत पिंगळे, सल्लागार दीपक लांबोर व पेडणे तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. त्‍यांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्‍याबद्दल समाधान व्‍यक्त केले.

पेडणे धनगर समाज समितीची निवड

यावेळी पेडणे धनगर समाज समितीची निवड करण्यात आली. अध्यक्ष बाळू शिंदे, सचिव नावू वरक, खजिनदार प्रकाश शिंदे, उपाध्यक्ष समेश बुटे, धाकू वरक, सहसचिव भरत वरक, उपखजिनदार सुरश बुटे तर सदस्य म्‍हणून प्रदीप वरक, धुळू कोकरे, जनार्दन झोरे, जानू वरक, सल्लागार संदीप जंगले, जानू खरात, विजय वरक, संदीप वरक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

धनगर कुटुंबांच्या घराचे बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे पहिल्याच पावसात या घरांना गळती लागली. आता सरकार दरबारी पाठपुरावा करून घरे दुरुस्‍तीसाठी प्रत्येकी पाच लाखांची मदत सरकारकडून केली जाणार आहे.
प्रवीण आर्लेकर, आमदार (पेडणे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT