Kanhaiya Kumar

 

Dainik Gomantak

गोवा

कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली उद्या राजभवनवर धडक मोर्चा

बंडखोर युवकांचे आकर्षण आणि कॉंग्रेस पक्षाची मुलुखमैदान तोफ, कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Kanhaiya Kumar: बंडखोर युवकांचे आकर्षण आणि कॉंग्रेस पक्षाची मुलुखमैदान तोफ, कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात त्यांच्या म्हापसा आणि मडगाव येथे दोन सभा होणार असून उद्या (शुक्रवारी) राजभवनवर नेल्या जाणाऱ्या धडक मोर्चाचेही ते नेतृत्व करणार आहेत.

आज सायंकाळी पाच वाजता कन्हैया कुमार ‘बहुजन संवाद’ कार्यक्रमात ओबीसी, एससी, एसटी समाजातील प्रमुख नेत्यांशी म्हापसा टॅक्सी स्टॅण्ड येथे संवाद साधणार आहेत. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मडगावात एमसीसी हॉल येथे कॉंग्रेस पक्षातर्फे (Congress) आयोजित ‘युवा स्पंदन’ कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

उद्या दुपारी 3:30 वाजता कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित राजभवनवरील धडक मोर्चाचे नेतृत्वही कन्हैया कुमार करणार आहेत. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित असतील. कॉंग्रेस पक्षातर्फे भाजप (BJP) सरकार विरोधातील आरोपपत्राची एक प्रत राज्यपालांना देण्यात येणार आहे. कन्हैया कुमार यांच्या दौऱ्यामुळे युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT