Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अक्कलकोट-शिर्डी देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; महिलेचा मृत्यू, तिघे जखमी

Goa Devotees Car Accident: अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (२८ मार्च) आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे घडली.

Sameer Amunekar

आजरा: अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (२८ मार्च) आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघंजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील भोसले कुटुंब अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परत येत असताना त्यांच्या कारचा सुळेरान येथे अपघात झाला. या अपघातात अंकिता अजित भोसले यांचा मृत्यू झाला. तर अजित हरिश्चंद्र भोसले, आशिष अजित भोसले आणि अंकेश अजित भोसले हे तिघंजण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटे चारच्या सुमारास आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकाला धडकून पलटी झाली.

जखमींवर उपचार सुरू

भोसले कुटुंबीय बुधवारी दुपारी म्हापसातील आपल्या निवासस्थानाहून शिर्डी व अक्कलकोट देवदर्शनासाठी निघाले होते. गुरुवारी दर्शन करून सायंकाळी सहा वाजता परतीच्या प्रवासाला निघाले.

गोव्याच्या दिशेनं जात असताना आज सकाळच्या सुमारास सुळेरान येथे वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारनं नियंत्रण गमावलं आणि रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकाला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींना आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT