Basilica of Bom Jesus Church Old Goa Dainik Gomantak
गोवा

Old Goa: 'समोसावाल्याचा मुलगा धाबा मालकाच्या मुलीशी लग्न करतो तेव्हा', चर्चसमोरील राड्यावरून भडकले नेटकरी

अनेकांनी पर्यटकांवर मजेशीर तसेच खोचक शब्दात टीका केली आहे.

Pramod Yadav

जुने गोवे (ओल्ड गोवा) येथील प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चसमोर रविवारी (दि.12) सकाळी मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक या दिवशी चर्चला भेट देत असतात. दरम्यान, सकाळी महिला पर्यटक आणि चर्चचे सुरक्षा रक्षक यांच्या मोठा वाद झाला व महिला पर्यटक आक्रमक झाली.

दरम्यान, आता या पर्यटक महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, या पर्यटकांचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अनेकांनी पर्यटकांवर मजेशीर तसेच खोचक शब्दात टीका केली आहे.

हरमन गोम्स नावाच्या एका व्यक्तीने या घटनेचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर एका व्यक्तीने दिलेली कमेन्ट अतिशय व्हायरल होत आहे. "करोल बाग येथील यशस्वी समोसा विक्रेत्याचा मुलगा जेव्हा दक्षिण दिल्लीतील प्रसिद्ध धाबा मालकाच्या मुलीशी लग्न करतो... भाई एटिट्युड तर नॅचरल आहे." अशी कमेन्ट सार्सी शार्क या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे.

तसेच, नाम मे क्या रखा है नावाच्या एका अकाऊंटवरून देखील या व्हिडिओवर कमेन्ट करण्यात आली आहे. दिल्ली एनसीआर कधीच नाराज करत नाही मग ते लदाख असो की गोवा किंवा कुठेही. असे ट्विट त्याने केले आहे.

"या उत्तर भारतीयांना गोव्यामध्ये घ्यायचं बंद करा. अशिक्षेत अडाणी बीमारू गायपट्ट्यातले उत्तर भारतीय यांना कशाला प्रवेश देता गोव्यामध्ये?" असे ट्विट एका व्यक्तीने केले आहे.

याशिवाय अनेकांनी विविध कमेन्ट या व्हिडिओ केल्या आहेत. यात कोणी पर्यटकांवर रोष व्यक्त केला आहे. तर, अनेकांनी प्रशासनाला काही सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, हा विषय रविवारी सर्वदूर पसरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT