desecration of idols dainik gomantak
गोवा

Desecration Idols : सां जुझे द आरियल येथे देवाच्या मूर्तींची विटंबना

धार्मिक सलोखा बिघडनाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : सां जुझे द आरियल या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखविण्याचा प्रकार घडला उघडकीस आला आहे. येथे पंचायती समोर शेतामध्ये असलेल्या सायबीणीच्या तसेच अन्य काही मुर्त्यांची तोडफोड करून अज्ञातांनी मोठया प्रमाणात नासधूस केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून या प्रकरणात गुंतलेल्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (desecration of idols by some From the unknown at san juje da areal)

येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रात्री घडले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पंचायतीसमोर (Panchayat) असलेल्या मुर्त्यांची तोडफोड आधी करण्यात आली. त्यानंतर शेतामध्ये असलेल्या फातिमा सायबीण, हॉली फॅमिली आणि अन्य एका मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या विषयी येथील रहिवाशी व्हिन्सी मास्कारेन्हस यांनी सांगितले की, येथे दोन ठिकाणी मुर्त्यांच्या तोडफोड केली असून ती एका दारुड्याने आणि माथेफिरूने केली आहे. तसेच इतर दोन ठिकाणी मुर्त्यांची तोडफोड जाणून बुजून केल्याची शक्यता आहे. येथे सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत, मात्र असला प्रकार येथे प्रथमच घडला आहे. त्यामुळे धार्मिक (Religious) सलोखा बिघडनाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT