RG Dainik Gomantak
गोवा

144 In Sattari: आरजीची पदयात्रा रोखल्यानंतर आज सत्तरीत जमावबंदीचे आदेश

उपजिल्हाधिकारी यांनी सत्तरीत आजपासून कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

Pramod Yadav

‘म्हादई बचावा’साठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने सत्तरी तालुक्यातील ठाणे येथून सुरू केलेल्या पदयात्रेवर आज पहिल्याच दिवशी म्हाऊस पंचायतीने आक्षेप नोंदवल्‍याने सायंकाळी ती प्रशासनाने रोखली. तीन तासांनंतर तेथील वादावर पडदा पडला. परंतु, त्‍यानंतर सदर यात्रा कोपार्डे येथे पोहोचली असता, काही जणांच्‍या तक्रारीवरून प्रशासनाने पुन्‍हा अटकाव केला. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला.

दरम्यान, उपजिल्हाधिकारी यांनी सत्तरीत आजपासून कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

सत्तरी तालुक्यात पदयात्रा रोखल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आज तालुक्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पदयात्रेच्या सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सत्तरी तालुक्यात वाळपई, पर्ये मतदारसंघांत मिळून विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ने दहा हजार मते घेतली होती. त्यामुळे म्हादईसारखी समस्या निर्माण होते, त्यावेळी त्या लोकांना पाठिंबा देण्याची पक्षाची नैतिक जबाबदारी असते. म्हणूनच ठाणे येथून पदयात्रा सुरू केली होती. पण याला राजकीय वळण देत काहींनी पदयात्रा रोखली. पण आम्ही मागे हटणार नाही. सत्तरी तालुका कुणाच्या बापाचा नाही, असे रोखठोक प्रतिपादन मनोज परब यांनी मंगळवारी केले आहे.

तर, "आम्ही पदयात्रा अडवलेली नाही. तर पंचायतींनी त्या पदयात्रेस विरोध केला आहे. पण माझा एकच सवाल आहे त्यांनी सत्तरीतच का पदयात्रा सुरू केली. त्यांचे स्वतःचे गाव आहे त्यांनी तिथून करायची होती सुरवात. ही राजकीय हेतूने सुरू केलेली पदयात्रा आहे. पदयात्रेत सर्व लोक बाहेरचे. सत्तरीचे लोक त्यात काही नाही. स्थानिक पंचायत बॉडींनी आम्हाला हा त्रास नको असे म्हटले आहे. स्थानिकांनीच या पदयात्रेला विरोध केला आहे." असे आमदार दिव्या राणे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ‘आरजी’ची यात्रा 28 फेब्रुवारीपर्यंत 100 किलोमीटर अंतर पार करणार आहे. सोमवारी पदयात्रा ठाणे येथे येताच वाळपई पोलिसांनी आक्षेप घेत रोखली. म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे यांनी शासनदरबारी आक्षेप घेतल्याने पदयात्रा रोखत पोलिसांचा फौजफाटाही ठाणे येथे दाखल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT