Subhash Shirodkar X
गोवा

Goa Assembly Session: 5 लाखांपेक्षा जास्त ठेवींबाबत निर्णय घेणार, ‘मडगाव अर्बन’बाबत योग्य विचार करू; मंत्री शिरोडकरांचे आश्वासन

Goa Assembly winter session 2025: शिरोडकर यांनी दर दोन महिन्यांनी बॅंकेच्या अवसायनकांच्या कारभाराचा आढावा घेणार असल्याचे नमूद केले.

Sameer Panditrao

Margao Urban Bank Updates Subhash Shirodkar

पणजी: बुडालेल्या मडगाव अर्बन बॅंकेत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्यांचे पैसे परत देता येतात का हे तपासून पाहू. सहकारमंत्र्यांच्या पातळीवर तसा निर्णय घेता येत असल्यास त्याचा जरूर विचार करू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज विधानसभेत दिले.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, पाच लाख रुपयांपर्यंत मडगाव अर्बन बॅंकेत ठेवी असलेल्यांना पैसे परत मिळाले.

त्यावरील रकमेचे ठेवीदार अद्याप पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. बॅंकेवर सरकारने अवसायनक नियुक्त केला आहे. मालमत्ता विकल्या जात आहेत. कर्ज वसुली होत आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्यांचे पैसे देण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. अवसायनकांकडून सरकारच्या परवानगीची गरज असल्याचे सांगण्यात येते.

या बॅंकेत कुडतरी कोमुनिदादचे ९० लाख रुपये ठेव स्वरूपात आहेत. ती रक्कम अडकल्याने गेली तीन वर्षे कोमुनिदादच्या सभासदांना लाभांशही देता आलेला नाही, याकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.

पर्यायांचा विचार करू!

शिरोडकर यांनी दर दोन महिन्यांनी बॅंकेच्या अवसायनकांच्या कारभाराचा आढावा घेणार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ठेवीदारांचे पैसे परत करण्याची इच्छा आहे. त्यासाठी बॅंकेकडे पैसे असायला हवेत. कर्ज वसुली, मालमत्ता विक्री असे मार्ग चोखाळले जात आहेत. ज्यांनी बॅंक बुडवली त्यांच्यावरही कारवाई होत आहे. सरकारच्या अधिकारात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करणे शक्य असल्यास त्याचा जरूर विचार करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT