Dengue in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू नियंत्रणात

जूनमध्ये आढळले 38 रुग्ण : स्वच्छता, जनजागृती मोहिमेचा परिणाम

दैनिक गोमन्तक

पणजी : मॉन्सून सक्रिय होऊन महिना उलटत आला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप डेंग्यू नियंत्रणात आहे. जूनमध्ये राज्‍यात एकूण 38 डेंग्यूची पुष्टी झालेले रुग्ण आढळले आहेत. जून 2021 मध्ये ही संख्या 63 होती. त्यामुळे आरोग्य खात्याने स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणली आहे.

मॉन्सून सुरू होण्यापूर्वीच खात्‍याने परिसर स्वच्छतेसाठी जनजागृती, फॉगिंग प्रक्रिया सुरू केली होती. पालिका आणि पंचायतींच्या सहकार्याने हे केले जात असल्याची माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण उपक्रमाच्या मुख्य अधिकारी डॉ.कल्पना महात्मे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे डेंग्यूची स्थिती नियंत्रणात आहे. अजूनही पावसाळ्याचे तीन महिने शिल्लक असून, गाफील राहून चालणार नाही, असे डॉ.महात्मे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कुळागर असलेल्या ठिकाणी डेंग्यू संसर्गाची शक्यता असते, कारण तेथे नारळाच्या कवट्यांमध्ये पाणी साचू शकते. त्‍यासंदर्भात कृषी खात्याला पत्र लिहून मार्गदर्शक तत्त्वे कळवली आहेत,असेही त्या म्हणाल्या.

कृषी अधिकाऱ्यांनी कुळागरात जाऊन निरीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच, रहिवाशी संकुलामध्ये कुंड्या ठेवल्या जातात. त्‍याखाली ताट ठेवल्याने त्‍यात पाणी साचू शकते. यासाठी सहकार खात्याच्या निबंधकांना पत्र पाठवले आहे.

सर्व गोष्टींचे वेळेत निरीक्षण केल्यास संसर्ग रोखला जाऊ शकतो. बंदर कप्तान व मत्स्योद्योग खात्यालाही बोटी झाकून ठेवण्याबाबत सूचित केले आहे. कारण बोटींमध्ये पाणी साठल्यास डेंग्यूचा संसर्ग होऊ शकतो, असे डॉ.महात्मे यांनी सांगितले.

वास्को, कुठ्ठाळीत डेंग्यू नियंत्रणात

2021 मध्ये राज्यात सर्वात जास्त डेंग्यूचे रुग्ण वास्को आणि कुठ्ठाळी मतदारसंघात आढळले होते. परंतु, आरोग्य खात्याने यंदा या दोन्ही ठिकाणी जागृती आणि फॉगिंग करून डेंग्यू बऱ्यापैकी नियंत्रणात आणला आहे.

येथे डेंग्यूचे प्रमुख कारण म्हणजे निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये पाणी साठवल्याने होत असल्याचे खात्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे बॅरल घट्ट बंद करून ठेवण्याची सूचना संबंधितांना केली होती. कर्मचाऱ्यांनी परिसरात जाऊन सतत निरीक्षण केल्याने स्थिती नियंत्रणात आली आहे,असे राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण उपक्रमाच्या मुख्याधिकारी डॉ.कल्पना महात्मे यांनी सांगितले.

बंदर कप्तान खात्याकडून सूचना जारी

पावासाळा सुरू असल्याने सर्व बोटी समुद्रकिनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत. परंतु, पावसाचे पाणी त्यात साठण्याची शक्यता असून, तेथे डासांच्या उत्पत्तीचे संभाव्य स्त्रोत, सार्वजनिक उपद्रव आणि आरोग्य धोक्याचे येऊ शकते.

यासाठी पर्यटक बोटींसह सर्व बार्जेस, शिपयार्ड्स/ड्रायडॉक्स, प्रवासी लाँच, जल क्रीडा बोट्स, फेरी बोट्स, मच्छीमार ट्रॉलरचे तांडेल, यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी यानांचे चालक आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात सर्व बोटी व्यवस्थित झाकून, बोटींमध्ये पाणी साचणार नाही, याची खात्री केली पाहिजे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास गंभीर दखल घेतली जाईल, अशी सूचना बंदर कप्तान खात्याने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT