Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

खोतोडे-सत्तरीत दुचाकींची तोडफोड

दुचाकींची तोडफोड करून सगुण यांच्या पत्नी, मुलांवर हल्ला करण्याची घटना

दैनिक गोमन्तक

वाळपई: खोतोडे - सत्तरी येथील घोलकरवाडा येथील दत्तू सगुण नाईक यांच्या घराच्या पटांगणात ठेवलेल्या दोन दुचाकींची तोडफोड करून सगुण यांच्या पत्नी, मुलांवर हल्ला करण्याची घटना रविवारी 3.30 वाजता घडली आहे. याबाबत दत्तू नाईक यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे, की काल साडेतीनच्या दरम्यान शेजारी राहणारा संशयित बाळू शांबा घोलकर हा घराजवळ आला. त्यावेळी माझी पत्नी, मुलगा व्हारांड्यात होते. संशयिताच्या हातात कुर्हाड होती.

त्यावेळी बाळू याने हल्ला केला व गलिच्छ शब्दात शिवीगाळ केली. तसेच तुळशी वृंदावनाचे नुकसान केले व एक स्कूटर, एक मोटारसायकल या दुचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. व्हरांड्यातील मार्बलच्या बांधकामाचीही तोडफोड करून नुकसान केले.

या घटनेत सुमारे साठ हजारांचे नुकसान झाले आहे. यावेळी तत्काळ शंभर नंबर क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कारवाई हाती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT