Demolition of Shops in Mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापसा-कळंगुट मार्गावरील 13 गाळे हटविले

दुकानदारांचा विरोध झुगारत पालिकेकडून ही कारवाई केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा : म्हापशातील कार्व्हालो पेट्रोल पंपानजीक रस्त्याच्या बाजूला असलेल्या 13 गाळेवजा दुकाने हटविण्याची मोहीम म्हापसा पालिकेने पोलिस बंदोबस्तात गुरुवारी हाती घेतली. जेसीबीच्या साहाय्याने ही दुकाने मोडण्यात आली. दुकानदारांचा विरोध झुगारत पालिकेकडून ही कारवाई केली जात आहे.

म्हापसा-कळंगुट मार्गावरील कार्व्हालो पेट्रोल पंपानजीक रस्त्याच्या बाजूला ही 13 गाळेवजा दुकाने होती. सध्या केवळ म्हापशाच्या बाजूनेच या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे सदर दुकानदारांना म्हापसा पालिकेने कदंबा बसस्थानक आवारातील आराम सोडा लेनच्या पहिल्या मजल्यावर जागा दिली आहे. मात्र, दुकानदारांना तळमजल्यावर दुकाने हवी आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या दुकानदारांनी एकत्रित येत पालिकेने दुकाने मोडण्याबाबत बजावलेल्या नोटीसीला विरोध केला होता.

या दुकानदारांचे म्हणणे आहे की, पालिकेने ज्या ठिकाणी आम्हाला जागा दिली आहे, ती अडगळीची आहे. शिवाय तिथे वीज कनेक्शन आणि इतर सुविधा नाहीत. अशावेळी आम्ही तिथे जाऊन धंदा कसा करायचा? तसेच पालिकेने दुकानातील साहित्य काढण्यास पुरेसा वेळही दिला नाही. ही एकप्रकारची हुकूमशाही असल्याचा आरोप करीत त्यांनी पालिकेच्या या कृतीचा निषेध केला.

दरम्यान, मागील 40 ते 50 वर्षे हे दुकानदार याठिकाणी गाळेवजा दुकानातून आपला व्यवसाय करायचे. यात काही जनरल स्टोअर, मेकॅनिक, लेथ मशीनवाले, टेलर, शीतपेयवाले आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT