Pernem Portuguese building Dainik Gomantak
गोवा

Pernem: पोर्तुगीज काळातील शिपायांचे वसतीस्थान पाडण्याच्या कामास प्रारंभ, 7 महिन्यांपूर्वी कोसळला होता भाग

Pernem Market Portuguese building: कोसळलेल्या इमारतीच्या याच भागात एक कुटुंब राहत होते; पण तीन-चार वर्षांपूर्वी हे कुटुंब अन्यत्र बांधलेल्या आपल्या घरात राहण्यासाठी गेले होते.

Sameer Panditrao

पेडणे: पेडणे बाजारपेठेतील सात महिन्यांपूर्वी एक भाग कोसळलेली पोर्तुगीजकालीन इमारत पेडणे नगरपालिकेच्या आदेशानुसार पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

पेडणेहून म्हापसा-पणजीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याजवळ ही एकमजली इमारत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून या बाजूने वाहतूक बंद केली असून ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. ही इमारत पोर्तुगीजकालीन असून पोर्तुगीज काळात या इमारतीच्या अर्ध्या भागात पोर्तुगीज शिपाई (पाखले) राहात होते. गोवा स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या इमारतीत एक कुटुंब तसेच एक औषधालय व दोन दुकाने होती.

११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा एका बाजूचा मोठा भाग कोसळून पडला होता.

या इमारतीच्या जवळून म्हापसा-पणजीला जाणारी एकेरी वाहतूक सुरू असते. इमारत कोसळण्यापूर्वी या इमारतीचे काही छोटे अवशेष पडायला सुरुवात झाल्यावर जागरूक नागरिकांनी या जवळच्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना रोखले व त्याची पेडणे पोलिसांना माहिती दिल्यावर बॅरिकेड्‌स घालून हा रस्ता बंद करण्यात आला होता.

कोसळलेल्या इमारतीच्या याच भागात एक कुटुंब राहत होते; पण तीन-चार वर्षांपूर्वी हे कुटुंब अन्यत्र बांधलेल्या आपल्या घरात राहण्यासाठी गेले होते. तर पेडणे नगरपालिकेने नोटीस काढून तेथील दुकानदारांना त्यांचे दुकानातील सहित्य काढण्यास सांगून दुकानांना सील ठोकले होते.

दोन दिवसांत काम पूर्ण

एक आठवड्यापूर्वी ही धोकादायक इमारत पाडण्यासाठी या इमारतीवरील कौले काढण्यात आली; पण त्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे पेडणे पालिकेने त्वरित कारवाई करून जोरदार पाऊस असतानाही जेसीबी यंत्र व मजुरांच्या मदतीने इमारत पाडण्याचे काम सुरू केले. येत्या दोन दिवसात संपूर्ण इमारत पाडून तिचे सपाटीकरण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT