Goa News` Dainik Gomantak
गोवा

Goa News: नारळ फेणी, गूळ, विनेगरला ‘जीआय टॅग’ देण्याची सरकारकडे मागणी करणार

Goa News: टॉडी टॅपर्स : सरकारी नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावे

दैनिक गोमन्तक

Goa News: नारळाची फेणी, नारळापासून तयार केलेला गूळ व विनेगरला जीआय टॅग मिळवून देण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत, असे अखिल गोवा टॉडी टॅपर्स असोसिएशनचे अध्यक्ष फ्रांसिस फर्नांडिस यांनी सांगितले. असोसिएशनच्या मासिक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

याबाबत यापूर्वीही आम्ही सरकारकडे मागणी केली होती. या मागणीवर आम्ही पुन्हा जोर देणार आहोत. गोव्याच्या नारळ फेणीला 400 वर्षांचा इतिहास आहे. नारळाचा माडाला राज्य वृक्ष म्हणून मान्यताही आहे.

त्यामुळे या उत्पादनाला जीआय टॅग देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. तसेच सरकारी नोकरीत व शिक्षणातही आम्हाला आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी फर्नांडिस यांनी केली.

आपण कुंभार, मच्छीमार यासारख्या समाजाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या संघटना कशा कार्य करतात त्याची माहिती मिळविणार असल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले.

आमची संघटना अस्तित्वात आहे, संघटनेची कचेरी व्यवस्थित चालत आहे व समाजासाठी पूर्णपणे कार्यरत आहे हे पण आम्हाला दाखवून द्यायचे आहे, असेही फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT