Goa protest Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

St. Francis Xavier: सुभाष वेलिंगकर यांना शनिवारी (ता. ५) सकाळी साडेसात वाजेपर्यंत अटक करण्यासाठी सरकारला संतप्त जमावाने मुदत दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणारे सुभाष वेलिंगकर यांना शनिवारी (ता. ५) सकाळी साडेसात वाजेपर्यंत अटक करण्यासाठी सरकारला संतप्त जमावाने मुदत दिली आहे. अन्यथा मडगाव बंदचा इशारा दिला आहे. या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत डिचोली पोलिस ठाण्यात वेलिंगकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या २९९ कलमांतर्गत हा गुन्हा आज रात्री ८.४७ वाजता नोंदविला. त्यांनी डिचोलीतील आझाद मैदानावर केलेल्या वक्तव्यावर वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊस्कर तपास करणार आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत आंदोलक पोलिस ठाण्याच्या परिसरात ठाण मांडून होते. रात्री विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

‘तो’ न्‍याय यावेळी का नाही?

हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या म्‍हणून फा. बोलमॅक्‍स यांना अटक करण्‍यासाठी तत्‍परता दाखविणारे पाेलिस वेलिंगकर यांना अटक करण्‍यासाठी तत्‍परता का दाखवत नाहीत, असा सवाल आंदोलकांनी केला. जोपर्यंत वेलिंगकर यांना अटक केली जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, असे सांगत आंदोलक पोलिस ठाण्यावर चाल करून आले होते.

आमदार क्रूझ सिल्वाही लोकांसोबत

वेलिंगकर यांच्‍या विरोधात जो गुन्‍हा नोंद केला आहे त्‍याची एफआयआर प्रत आम्‍हाला दाखवा, असे म्‍हणत आंदोलकांनी मडगावात रस्‍ता अडवला. या आंदोलकांबरोबर वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा, प्रतिमा कुतिन्‍हाे, सावियो कुतिन्‍हो, अन्‍य स्‍थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रांसिस झेव्हियर यांच्याबाबत दुर्दैवी विधान केले. त्याच्या विरोधात अनेकांनी तक्रारी नोंद केल्या आहेत. त्यावर सरकार योग्य ती कारवाई करेल, असे पर्यावरण व कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मंत्री सिक्वेरा म्हणाले, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक मासळी फॅक्टरी तर तीन मासळी प्रक्रिया युनिट वरील बंदी हटवली आहे पण त्यांना दंड ठोठावलेला आहे. त्यांचे काम लवकरच सुरु होईल. मात्र त्यांच्याकडून परत हलगर्जीपणा झाला तर फॅक्टरी व युनिट कायमस्वरुपी बंद करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही मंत्री सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Abhinav Tejrana Double Century: रणजी पदार्पणातच ठोकलं द्विशतक, तेंडुलकर, कोहलीला जे जमलं नाही, ते करुन दाखवलं; अर्जुन तेंडुलकरनंतर गोव्याचा 'अभिनव' चमकला

SCROLL FOR NEXT