Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

राणेंकडून खालच्या पातळीवर राजकारण : डिलायला लोबो

कुणीही सत्ता डोक्यात घालून घेऊ नये : डिलायला लोबो

दैनिक गोमन्तक

म्हापसा : मंत्री विश्वजीत राणे हे आता वैयक्तिकरित्या लक्ष्य करू पाहताहेत आणि ते आमच्या व्यवसायावर गेले आहेत. मुळात ‘बागा डेक’ व ‘नाझरी रिसॉर्ट’चे बांधकाम विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे राजकारणात येण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरजच नाही, असे म्हणत शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी मंत्री राणे यांच्या भूमिकेवर टीका केली. शनिवारी त्या शिवोलीत माध्यमांकडे बोलत होत्या.

जर ओडीपी योग्य नसल्यास त्या दुरुस्त करा, पण अशाप्रकारे खालच्या पातळीवर सुरू असलेले हे राजकारण मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे आणि ते असे कुठल्या कारणास्तव करताहेत, याचे उत्तर मंत्री राणे हेच देऊ शकतात, असेही डिलायला म्हणाल्या.

मंत्री विश्वजीत राणे हे मुळचे काँग्रेसचे. आता ते भाजपात गेले आहेत आणि तिथे मंत्री बनले आहेत. ही बाब आम्ही समजून घेतली पाहिजे, यावर डिलायला लोबोंनी जोर दिला.

डिलायला पुढे म्हणाल्या की, कुणीही सत्ता डोक्यात घालून घेऊ नये. कारण, परमेश्वर सगळे पाहतोय आणि प्रत्येकाला देवाची भीती असावी. मुळात असे वैयक्तिकरित्या लक्ष्य करणे अयोग्य आहे. मंत्री राणे हवे ते करू द्या, आमच्याकडे सर्व परवाने आहेत, असे डिलायला यांनी शेवटी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT