Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Anjuna Tourist Attacked: हल्ल्याला पर्यटकही जबाबदार; त्‍यांच्‍यावर कारवाई व्‍हावी : दिलायला लोबो

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची घेतली भेट

दैनिक गोमन्तक डिजिटल

Delilah Lobo on Anjuna Tourist Attacked: हणजूण येथे दिल्लीच्या पर्यटकांवरील हल्ल्याला स्थानिक जबाबदार आहेत तितकेच पर्यटकही जबाबदार आहेत. त्यामुळे पर्यटकांनी दगडफेक करून केलेला हल्लाप्रकरणी स्थानिकांची तक्रार दाखल करून पर्यटकांविरुद्धही गुन्हा दाखल करावा.

या हल्ल्याला कारणीभूत असलेल्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून समान न्याय द्यावा, अशी मागणी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची भेट घेऊन केली.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पर्यटकांची तक्रार दाखल करून पोलिसांनी हणजूण येथील स्थानिक संशयितांना गजाआड केले आहे. ते अजूनही कोठडीत आहेत. हा हल्ला पर्यटकांनी दिलेल्या चेतावणीमुळे घडला.

पर्यटक ज्या हॉटेलमध्ये उतरले तेथे रॉयस्टन कामाला होता. यावेळी त्यांच्यात व पर्यटकांमध्ये हॉटेलच्या नियमांवरून बाचाबाची झाली होती. हॉटेल व्यवस्थापकाने रॉयस्टन याला घरी पाठवले होते. मोबाईलचा चार्जर विसरल्याने तो हॉटेलमध्ये आले असता त्या पर्यटकांच्या जमावाने पुन्हा त्याच्याशी हुज्जत घातली व त्‍यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे, असेही लोबो म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT