Beef Smuggling Goa Dainik Gomantak
गोवा

Beef Smuggling: मडगाव रेल्वेस्थानकावर पकडले 70 किलो गोमांस, दिल्लीतून आले पार्सल; चिकनच्‍या नावाखाली वाहतूक

Margao Beef Smuggling: दिल्‍लीतून गोव्‍यात बीफची तस्‍करी केली जात असल्‍याचे आज पुन्‍हा एकदा उघड झाले. चिकनच्‍या नावाखाली १५ पेट्यांचे पार्सल दिल्‍लीहून पाठविले होते.

Sameer Panditrao

मडगाव: दिल्‍लीतून गोव्‍यात बीफची तस्‍करी केली जात असल्‍याचे आज पुन्‍हा एकदा उघड झाले. चिकनच्‍या नावाखाली १५ पेट्यांचे पार्सल दिल्‍लीहून पाठविले होते. आज मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर ते उतरवल्‍यावर या १५ पैकी १० पेट्या (७० किलो) बीफच्‍या असल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे दिल्‍लीतून होणारी बीफची तस्‍करी अजुनही थांबलेली नाही हे उघड झाले आहे.

‘केसरिया हिंदू वाहिनी गोरक्षक प्रकोष्ठ’च्या राजीव झा यांनी आज हा प्रक़ार उघडकीस आणला. हे पार्सल नेण्यासाठी आलेल्या एका संशयिताला कोकण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मडगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक सहावर रेल्वेतून आलेल्या पार्सलमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती झा यांना मिळाल्‍यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत कोकण रेल्वे पोलिसांना माहिती देत पार्सल खुले केले असता त्यात इतर मांसासोबत बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आलेले बीफही आढळून आले. शिवाय सदर पार्सल नेण्यासाठी आलेल्या पणजी येथील अख्तर बेपारी याला हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुडलरचा संबंध; झा

बॉक्समध्ये चिकन व मटनसोबत बीफही पाठवण्यात आले होते. ७० किलोची १५ पार्सल दिल्ली येथून पाठवण्यात आली होती. दोन दिवसांच्या प्रवासानंतर त्यातून पाणी वाहून वासही येत होता. कोकण रेल्‍वेचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांना झालेली अटकही याच तस्‍करीशी संबंधित असल्‍याचा दावा झा यांनी केला. गुडलर यांनी यापूर्वी बेकायदा बीफवर कारवाई केली होती. कारवाई टाळण्‍यासाठीच बीफ माफियांकडून त्यांना फसवण्यासाठी डाव रचण्यात आल्याचा आरोप झा यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT