Arvind Kejriwal ANI
गोवा

Arvind Kejriwal Goa Visit: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भगवंत मान यांच्यासह गोव्यात दाखल

केजरीवाल आणि मान यांचे रात्री साडे सातच्या सुमारास उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर आगमन झाले.

Pramod Yadav

Arvind Kejriwal Goa Visit: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल झाले आहेत. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील आहेत.

केजरीवाल आणि मान यांचे रात्री साडे सातच्या सुमारास उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर आगमन झाले.

"आमचे गोव्यात दोन आमदार आहेत आणि ते फार चांगले काम करत आहेत. वेंझी व्हिएगश मागील बऱ्याचकाळापासून आम्हाला बोलवत होते, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात महोल्ला क्लिनिक सुरु केले आहे. त्यांची पाहणी आम्ही उद्या करुन, आमचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार," असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी विमानतळावर उतरताच दिली.

तसेच, आज आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन असल्याने तिथे हाजेरी लावणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तयारीचा आढावा घेतील. राज्यातील पक्षाचे आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि वरीष्ठ नेते यांच्याशी ते चर्चा करतील.

आप इंडिया आघाडीचा भाग आहे पण अद्याप जागा वाटपाबाबत निर्णय झाला नसल्याने गोव्यात पक्षाला जागा मिळणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे. आम आदमी पक्ष गोव्यात एक जागा लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT