Arvind Kejriwal Goa Tour Ahead Of Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

एक दिवस वाढला, केजरीवाल यांचा गोवा दौरा आता तीन दिवसांचा; नवी तारीख आली समोर

केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या मागे लागले आहेत.

Pramod Yadav

Arvind Kejriwal Goa Visit: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रत्येक दिवस मौल्यवान ठरत आहे. अबकारी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीकडून तीन नोटिसा मिळाल्या आहेत.

केंद्रातील भाजप सरकारकडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असताना, केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या मागे लागले आहेत.

अबकारी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या नोटिसांमागे केजरीवाल यांना अटक करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

दरम्यान. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल लोकसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन पक्ष मजबूत करण्यात व्यस्त आहेत. यापूर्वी गोवा दौरा अचानक रद्द केल्यानंतर हा दौरा येत्या 18, 19 आणि 20 जानेवारीला नियोजित असल्याचे सांगितले जात आहे.

अरविंद केजरीवाल यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीशी संबंधित असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

या दौऱ्यात केजरीवाल गोव्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी हा दौरा 11 आणि 12 जानेवारीला नियोजित होता. पण, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांच्या तयारीशी संबंधित बैठकांमुळे मागील प्रस्तावित भेट रद्द करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT