Colva Goa Dainik Gomantak
गोवा

CRZ कायदा धाब्यावर बसवून कोलव्यात उभारलेला दिल्लीतील व्यावसायिकाचा बंगला भुईसपाट

Colva: २०२२ मध्ये दिला होता कारवाईचा आदेश विकास प्रतिबंधक क्षेत्रात बांधकाम

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवा: सीआरझेड कायद्याचा भंग करून कोलवा समुद्र किनाऱ्याजवळ पवनकुमार अरोरा या दिल्लीतील एका व्यावसायिकाने उभारलेला बंगला आज मंगळवारी बांधकाम हटाव पथकाने भुईसपाट केला. हे बांधकाम विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारले गेले असल्याचे नमूद करून गोवा किनारपट्टी प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२२ मध्ये हे बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता.

सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पाडण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालयातून हे बांधकाम पाडण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे गावकर यांनी सांगितले.

या बंगल्याच्या विरोधात कोलवा सिव्हीक फोरमच्या ज्युडिच आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने किनारपट्टी प्राधिकरणाला या प्रकरणावर सुनावणी घेण्यास सांगितले होते.

सुनावणीच्यावेळी हे बांधकाम समुद्राच्या भरती रेषेपासून २०० मीटर अंतरात असल्याचे दिसून आल्यावर ते पाडण्याचा आदेश देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT