Anjuna mobile theft Case  Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime News : घर फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा परप्रांतियांना अटक; हणजुण पोलिसांची कारवाई

3 मोबाइलसह 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Rajat Sawant

Anjuna mobile theft Case : हणजुण पोलिसांनी घर फोडून मोबाईल चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे संशयित परप्रांतीय असून 3 मोबाइलसह 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हणजुण पोलिस करीत आहेत.

म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्तरंजन प्रधान सध्या रा. शापोरा, बार्देश यांनी हणजूण पोलिसांत मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिली होती. तक्रारदार एका नामांकित हॉटेलचा हाऊसकीपिंग कर्मचारी असून तो मित्रांसमवेत भाड्याने राहत होता.

20 जुलैला 2 संशयित आरोपींनी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या खोलीत व त्याच्या मित्रांच्या खोलीत प्रवेश करून 3 मोबाईल आणि एक चार्जर असा एकूण 1 लाख 55 हजारांचा मुद्देमालावर डल्ला मारला.

हणजुण पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संशयितांवर पाळत ठेवली. चोरीची तक्रार नोंद होताच दोन तासांच्या आत पोलिसांनी दोन्ही आरोपींना गजाआड केले. प्रशांत सिंग (32, उत्तरप्रदेश) व परवेश हुसेन (19, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हणजुण पीआय प्रशाल पी.एन. देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पीएसआय साहिल वारंग, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, महेंद्र मांद्रेकर, अभिषेक कासार, रामा परब, सत्येंद्र नसनोडकर यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT