Goa Monsoon Delay News Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

Goa Monsoon Delay News: मान्‍सूनचा पाऊस रखडल्‍याने राज्‍यातील बहुतांशी नद्या अजूनही कोरड्या आहेत. त्‍यामुळे नागरिकांना धरणांतील पाण्‍यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मान्‍सूनचा पाऊस रखडल्‍याने राज्‍यातील बहुतांशी नद्या अजूनही कोरड्या आहेत. त्‍यामुळे नागरिकांना धरणांतील पाण्‍यावर अवलंबून रहावे लागणार आहे. अशा स्‍थितीत साळावली धरणातील पाणी घटल्‍यास त्‍याचा ओपा जलशुद्धीकरण प्रकल्‍पाला मोठा फटका बसण्‍याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

याबाबत ‘गोमन्‍तक’शी बोलताना जलस्रोत खात्‍याचे अधीक्षक अभियंता अंकुश गावकर म्‍हणाले, ‘‘साळावली धरण आणि खाणपीठांमधून ओपा जलशुद्धीकरण प्रकल्‍पाला १६५ एमएलडी पाण्‍याचा पुरवठा केला जातो. ओपा प्रकल्‍पातून फोंडा आणि तिसवाडी तालुक्यातील सुमारे ९५ टक्‍के भागाला पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यात येतो.

त्‍यात साळावली धरणातून ३० एमएलडी, खाणपीठांमधून ३० ते ३५ एमएलडी आणि उर्वरित पाणी नद्यांमधून पुरवले जाते. सध्‍या नद्या अजूनही कोरड्याच आहेत. त्‍यामुळे साळावली आणि खाणपीठातूनच या प्रकल्‍पाला पाण्‍याचा पुरवठा करण्‍यात येत आहे. परंतु, पाऊस आणखी लांबल्‍यास मात्र साळावलीतील पाणी कमी होऊन त्‍याचा फटका ओपाला बसू शकतो’’, असे गावकर म्‍हणाले.

‘‘राज्‍याला बंधाऱ्यांप्रमाणेच धरणांचीही गरज आहे. भविष्‍यात पावसासंदर्भात सध्‍यासारखी परिस्‍थिती उद्‍भवल्‍यास त्‍या धरणांमधून जनतेला पाण्‍याचा पुरवठा करणे शक्‍य आहे’’ असे गावकर म्‍हणाले. शिवाय ‘‘धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन प्रकल्‍पांना पूर्वीइतकाच

पाण्‍याचा पुरवठा करण्‍यात येत आहे’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT