Ponda Roads Hotmixing Delay Dainik Gomantak
गोवा

फोंड्यातील रस्त्यांना हॉटमिक्सिंगची प्रतीक्षा; रहिवाशी त्रस्त

Ponda Roads Hotmixing Delay : फोंडा शहरानजीकच्या रस्त्यांचे जरी हॉटमिक्स डांबरीकरण झालेले असले तरी, शहरातील प्रमुख रस्त्यांना अजूनही डांबराची प्रतीक्षाच आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा शहरानजीकच्या रस्त्यांचे जरी हॉटमिक्स डांबरीकरण झालेले असले तरी, शहरातील प्रमुख रस्त्यांना अजूनही डांबराची प्रतीक्षाच आहे. विठोबा मंदिर ते दादा वैद्य चौकपर्यंच्या तसेच आल्मेदा हायस्कूलनजीकच्या रस्त्याचे अजूनही हॉटमिक्स डांबरीकरण झालेले नसल्याने वाहतूकदारांना बराच त्रास सोसावा लागत आहे. शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे कामही संथ गतीने सुरू या रस्त्यांचा उद्धार कधी होणार,असा प्रश्‍न रहिवाशांकडून विचारला जात आहे.

गेली सहा वर्षे शहरात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवरून वाहन चालवणाऱ्या चालकांना अनंत अडचणींचा सामना करत वाहने हाकावी लागतात. शिवाय रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने समस्येत भर पडत आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण कधी होणार,असा प्रश्‍न फोंड्यातील नागरिक विचारत आहेत.

पावसाळा काही दिवसांवर आला असून हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम तातडीने करावे,अशी मागणी होत आहे. आधीच या रस्त्यांमुळे लोकांनी खूप भोगले असून खड्डेमय रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

पहिल्याच पावसात वाहून गेले होते रस्ते !

आता जर शहरातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले नाहीतर पावसाळ्यात स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी हॉटमिक्सिंग केलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले होते. त्यामुळे पावसाच्या वेळी हॉटमिक्स केलेले रस्ते टिकतात,किती यावर संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT