Dehradun Boy Cheat Rajasthan girl As Hindu
Dehradun Boy Cheat Rajasthan girl As Hindu Dainik Gomantak
गोवा

हिंदू असल्याचे सांगून मुलीची फसवणूक; म्हणे गोव्यात आहे हॉटेल, निघाला हायस्कूल नापास

Pramod Yadav

धार्मिक ओळख लपवून लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एका तरुणाला विकास नगर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील फोटो पाठवून मुलीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. विकासनगर, उत्तराखंड येथील ही घटना असून, दैनिक जागरणने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक जागरणने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संशयित फैजलने एक वर्षापूर्वी हिंदू असल्याचे सांगून इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री केली. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्यांचा संवाद सुरू झाला. मुलाने स्वत:चे हॉटेल गोव्यात असल्याची खोटी माहिती देखील दिली. संवाद वाढल्यानंतर त्याने मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मुलीने मुलीची माहिती घरात दिली व लग्नाची बोलणी करण्यास सांगितले.

लग्नासाठी मुलीच्या नातेवाईकांनी होकार दिला. रविवारी तरुणीचे नातेवाईक लग्न ठरवण्याच्या उद्देशाने तरुणाचे घर पाहण्यासाठी राजस्थानहून मेहुणवाला येथे मुलाच्या घरी गेले. दरम्यान, हा तरुण हिंदू नसल्याचे उघड झाले, तसेच त्याचे गोव्यात कोणतेही हॉटेल नसल्याचे देखील उघड झाले. एवढेच नव्हे तर संशयित मुलगा शालेय शिक्षणात देखील नापास झाल्याचे उघड झाले.

सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. मात्र, आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि अश्लील फोटो इंटरनेटवर प्रसारित केले. मुलीवर लग्नासाठी दबाव निर्माण केला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला रविवारी रात्री मेहुणवाला येथून अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT