Naval War College Video Dainik Gomantak
गोवा

Naval War College Video: गोव्यातील नौसेना युद्ध महाविद्यालय आतून कसे दिसते? पाहा व्हिडिओ

Naval War College: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वेरे-बेती येथील नौसेना युद्ध महाविद्यालयाचे राष्ट्रार्पण मंगळवारी (दि.05 मार्च) केले.

Pramod Yadav

Goa Naval War College Video

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वेरे-बेती येथील नौसेना युद्ध महाविद्यालयाचे राष्ट्रार्पण मंगळवारी (दि.05 मार्च) केले. महाविद्यालयाचे ‘चोला’ असे नामकरण करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गोव्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौसेना प्रमुख आर. हरी कुमार, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मिडिया एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओत महाविद्यालय इमारतीच्या अंतर्गत भागाचे दर्शन होत आहे.

भारतीय नौसेना दिवसेंदिवस प्रगती करत आहे.सशक्त होत आहे, परंतु त्याचा हेतू वर्चस्व गाजविण्याचा नसून तर समुद्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

हिंद महासागरातील सर्व शेजारी राष्ट्रांना त्यांची स्वायत्तता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भारताकडून मदतीचे प्रयत्न केले जात आहेत, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

आपल्या सागरी शेजारी देशांसोबत आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची भारताची वचनबद्धता कायम राहील, असेही सिंह यांनी सांगितले.

नव्या इमारतीमुळे महाविद्यालयात तिन्ही सेवांच्या (लष्कर, वायुसेना आणि नौदल) अधिकाऱ्यांना आताच्या तुलनेत तिप्पट अधिक प्रशिक्षण देण्यास मदत होणार आहे.

चोल राजवटीची सागरी शक्ती लक्षात घेऊन या आधुनिक वास्तूला चोल असे नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT