Goa Assembly Election 2022 Dainik gomantak
गोवा

सासष्टीत पक्षनिष्ठेचे वाजले तीन तेरा

नुवेसह सहा मतदारसंघांत पक्षबदलू उमेदवार

दैनिक गोमन्तक

मडगाव: सासष्टी तालुक्यात तब्बल आठ मतदारसंघ येतात. त्यातील मडगाव व फातोर्डा वगळले तर अन्य ठिकाणी पक्षनिष्ठेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येते.मडगाव व फातोर्डा येथे गतवेळी म्हणजे 2017 मध्ये निवडून आलेले आमदार यावेळीही त्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. तसेच नावेलीचे लुईजिन फालेरो (Luizinho Faleiro) शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अन्यत्र मात्र उलथापालथ दिसून येते. (defectors in nuvem and 6 other constituencies)

गत वेळी म्हणजे 2017 मध्ये नुवेतून बाबाशान ऊर्फ विल्फ्रेड डीसा हे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर तर बाणावलीतून चर्चिल आलेमाव-राष्ट्रवादी काँग्रेस,कुडतरी- आलेक्स रेजिनाल्ड-कॉंग्रेस, कुंकळ्ळी-क्लाफास डायस- कॉंग्रेस, वेळ्ळी- फिलीप नेरी- कॉंग्रेसतर्फे, नावेली- लुईजिन फालेरो यांनी कॉंग्रेसच्या (Goa Congress) उमेदवारीवर निवडणूक लढवली होती.

यावेळी चित्र उलटेपालटे झालेले आहे. यावेळी नुवेतून बाबाशान उर्फ विल्फ्रेड डीसा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. गतवेळच्या निवडीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता, पण नंतर भाजपचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यास अल्पसंख्याक अन् कॅथलिक मतदार दुरावतील,या भीतीने ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर भाजपने आपला उमेदवार उभा केला आहे.

कुडतरीत आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे प्रथमच अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तृणमूल (Goa TMC) मध्ये प्रवेश केला न नंतर बाहेर पडले. पण कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

कुंकळ्ळीत कॉंग्रेस तिकिटावर निवडून आलेले क्लाफास डायस यावेळी भाजपच्या उमेदवारीवर तर वेळ्ळीत गत वेळी कॉंग्रेस उमेदवारीवर निवडून आलेले व नंतर भाजपात गेलेले फिलीप नेरी मात्र यावेळी तृणमूलचे उमेदवार आहेत. बाणावलीतील चित्रही काहीसे असेच आहेत. गतवेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले चर्चिल आलेमाव यावेळी तृणमूलचे उमेदवार आहेत. नावेलीतून गतवेळी लुईजिन फालेरो निवडून आले होते पण नंतर ते तृणमूलमध्ये गेले व त्या पक्षाचे राज्यसभा खासदार बनले त्यामुळे ते या निवडणुकीत नाहीत. मडगाव व फातोर्डात मात्र तशी उलथापालथ झालेली नाही. दिगंबर कामत (कॉंग्रेस) व विजय सरदेसाई (गोवा फारवर्ड) हे दोघे यावेळीही त्याच पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT