Deepashree Sawant Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: लाखोंच्या देणग्या, महाप्रसाद, दागिने अर्पण; लोकांकडून उकळलेल्या रुपयांतून 'दीपश्री'चे कारनामे

Deepashree Sawant Case: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यातील प्रमुख ठकसेन दीपश्री सावंत गावस हिचे एक एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. नोकरीसाठी लोकांकडून उकळलेल्या लाखो रुपयांतून तिने स्वत:चे उखळ पांढरे करतानाच मुक्त हस्ताने देवधर्मही केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam Bicholim Deepashree Sawant Case

डिचोली: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यातील प्रमुख ठकसेन दीपश्री सावंत गावस हिचे एक एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. नोकरीसाठी लोकांकडून उकळलेल्या लाखो रुपयांतून तिने स्वत:चे उखळ पांढरे करतानाच मुक्त हस्ताने देवधर्मही केला. गावातील देवीला दागिना अर्पण करतानाच तिने वारकरी मंडळालाही देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे.

सरकारी नोकरीसाठी अनेकांना लाखो रुपयांना टोपी घालणाऱ्या दीपश्रीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. दीपश्रीच्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची पाळेमुळे डिचोलीपर्यंत पोचली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वस्तुत: दीपश्रीच्या विरोधात डिचोलीतून अद्याप फसवणुकीची तक्रार दाखल झाली नसली, तरी दीपश्रीचे डिचोलीशी असलेले संबंध आणि यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता, ही शक्यता नाकारताही येत नाही.

दरम्यान, नोकरीच्या आमिषाने चार बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रिया यादव हिला न्यायालयात पोलिस रिमांड मागून घेण्याची शक्यता आहे. ती सध्या अन्य एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीत असून सोमवारी तिचा रिमांड संपणार आहे.

यापूर्वीही अटक

दोन वर्षांपूर्वी दीपश्रीला एका फसवणूक प्रकरणात डिचोली पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटका होण्यापूर्वी तिने एक रात्र पोलिस कोठडीची हवाही खाल्ली होती, अशी माहिती मिळाली आहे. डिचोली तालुक्यातील सर्वण हे दीपश्रीचे माहेर असले, तरी प्रेमविवाह झाल्यानंतर तिचे माहेरशी संबंध काहीसे दुरावले होते. मात्र, अधूनमधून ती डिचोलीत येत होती, असे सांगण्यात आले.

‘म्हामणी’ उत्सवासाठी महाप्रसादाचे आयोजन

तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच १७ जुलै रोजी दीपश्री सावंत ही माहेरी सर्वणला होती. तेथील एका वारकरी मंडळाच्या ‘म्हामणी’ उत्सवाला ती उपस्थित होती. महाप्रसादासाठी दीपश्रीने या वारकरी मंडळाला दोन लाखांची देणगी दिली होती. याव्यतिरिक्त देवीला सोन्याचा दागिना अर्पण केला होता, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

कोणाच्या विनंतीवरून दानधर्म?

दीपश्री सर्वण येथे कोणाच्या आमंत्रणावरून म्हामणी उत्सवाला आली होती आणि कोणाच्या विनंतीवरून तिने हे दान दिले होते, हे अद्याप उघडकीस आलेले नाही. ज्यावेळी दीपश्रीने ही देणगी दिली, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दीपश्रीने सर्वण गावापासून जवळच भूखंड विकत घेतला असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे.

पूजा नाईकचा मुक्काम पोलिस कोठडीतच

केरी-फोंडा येथील श्रीधर सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात अटकेत असलेल्या पूजा नाईक हिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिला म्हार्दोळ पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. अनेकांना आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT