Sugarcane Farm Dainik Gomantak
गोवा

Sugarcane Farming: गोव्यात ऊस लागवडीत होतेय घट! उत्पादन आले निम्यावर; कारणे जाणून घ्या

Goa Agriculture News: संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यामुळे उसाचा कुठे पाठवायचा, मिळणारे अनुदान आणि इतर समस्यांमुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Sugarcane Production In Goa

पणजी: राज्यात ऊस उत्पादन हे एक महत्त्वाचे उत्पादन होते. अनेक कुटुंबीयाची उपजीविका ही केवळ ऊस उत्पादनावर चालायचे, परंतु संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यामुळे उसाचा कुठे पाठवायचा, मिळणारे अनुदान आणि इतर समस्यांमुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

९०च्या दशकात वर्षाला सुमारे ५५ हजार टन ऊस उत्पादन घेतले जायचे, ते आता निम्यावर म्हणजे २५६५७ टन उत्पादनावर येऊन ठेपले आहे. अनेक तालुक्यांमध्ये ऊस लागवडच संपुष्टात आली असून ज्या तालुक्यांमध्ये लागवड करण्यात येतेय त्या तालुक्यांमध्ये लागवडीत वर्षाला मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने गोव्यातील ऊस लागवड संपुष्टात येणार की काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राज्यात गेल्यावर्षी ४९१ हेक्टर क्षेत्रफळात ऊसाची लागवड करण्यात आली होती, तर यंदा ४४६ हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आली असून हेक्टर क्षेत्रफळात घट झाली आहे.

उत्तर गोव्यातील केवळ पेडणे आणि सत्तरी तालुक्यात आता ऊसाची लागवड करण्यात येते. पेडणे तालुक्यात यंदा ५ हेक्टर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. तर सत्तरी तालुक्यात ९ हेक्टर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पेडणे तालुक्यात १ हेक्टरने तर सत्तरी तालुक्यात तब्बल १० हेक्टरने ऊस लागवड घटली असल्याचे कृषी खात्याच्या उपलब्ध आकडेवारीतून समोर आले आहे.

दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात राज्यातील सर्वाधिक म्हणजे २९४ हेक्टर क्षेत्रफळावर ऊस लागवड करण्यात येते. सांगे आणि धारबांदोडा तालुक्यात लागवडीत घट झालेली नाही, परंतु काणकोण आणि केपे तालुक्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रत्येकी १७ हेक्टरने घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT