महादेव खांडेकर Dainik Gomantak
गोवा

'सरकार तुमच्या दारी' उपक्रम मते मिळवण्यासाठीच

BJP सरकारने किती नोकऱ्या दिल्या ते जाहीर करा

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या गोवा सरकारने सरकार तुमच्या दारी हा जो उपक्रम सुरु केला आहे, तो लोकांच्या हितासाठी नव्हे तर मते मिळवण्यासाठी आहे. अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते महादेव खांडेकर यांनी केली आहे.

पणजी येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली. गेली साडेचार वर्षे लोकांच्या दारी जाऊन लोकांना दिलासा न देता फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांकडे जाऊन भाजपची मते मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याची टीकाही खांडेकर यनी यावेळी केली. हा उपक्रम म्हणजे लोकांची फसवणूक असून लोकांनी या फसवणुकीला बळी पडू नये. असे आवाहन खांडेकर यांनी यावेळी केले.

नोकऱ्यांच्या नावाने गोमंतकियांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. कारण या नोकऱ्यासाठी सरकारने आर्थीक तरतूद केलली नाही. असा दावा करुन सध्याचे सरकार हे निवडणुकीच्या तोंडावर एक एक उफक्रम घेऊन येऊन लोकांची फसवणूक करत आहे. सराकारी प्रशासन योग्य चालत नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. गावागावातील बंधारे ते अटल सेतुपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. असा आरोप खांडेकर यांनी यावेळी केला. यापुर्वी खाणी सुरु करण्याचे आश्‍वासन दिले, मात्र ते पाळलेच नाही. त्यामुळे या सरकारवर लोकांनी अजिबात विश्‍वास ठेऊ नये. असे खांडेकर म्हणाले.

किती नोकऱ्या दिल्या ते जाहीर करा

गेल्या दहा वर्षात सरकारने किती नोकऱ्या दिल्या, किती व्यावसायीक तयार केले, याची माहिती गोवा सरकारने जाहिर करावी. नोकरीचे आमिष ही फसवणूक असून युवकांनी सावध व्हावे व या सरकारवर विश्‍वास ठेऊ नये. असे आवाहन यावेळी खांडेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT