Panjim Municipal Council Meeting Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipal Council: मासळी बाजाराचा पुनर्विकास निर्णय; रस्त्यांवरून खडाजंगी

Panaji Municipality Meeting: सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी यावेळी दिले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. ६ (प्रतिनिधी) : येथील मासळी बाजाराचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाचा निर्णय महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. राजधानीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून नगरसेवकांत खडाजंगी झाली. तसेच अनेक महत्त्वाच्या समस्या महापालिकेच्या बैठकीत नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्या. या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी यावेळी दिले.

पाऊस पडल्यानंतर नेवगीनगर क्षेत्रात पाणी भरण्यास आणि २२ तास ते पाणी तसेच राहण्यास जलसंपदा विभाग आणि विभागात काम करणारे अभियंते जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक शुभम चोडणकर यांनी केला.

चोडणकर यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, मी स्वतः जलसंपदा विभागाला याची माहिती देऊन भविष्यात उद्भवणारी ही समस्या सोडविण्याची विनंती केली होती. मात्र, विभागातील अधिकारी फक्त अहंकार दाखवतात. याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत असल्याने महापौराने मंत्र्यांना भेटावे आणि हा प्रश्न निकाली लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नगरसेवक माखिजा पिंटो यांनी लोकोत्सव आणि इतर महोत्सवांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासांवर भाष्य केले. सरकार मोठे महोत्सव करतात. मात्र, त्याचा काहीच फायदा महानगरपालिकेला होत नाही. स्मार्ट सिटीमुळे रस्ते बंद असल्याने वाहतुकीस मार्ग मोकळे नव्हते आणि पार्किंग सोयदेखील नियोजित केलेली नव्हती.

स्थानिकांच्या घरासमोर पार्किंग केले. रुग्णवाहिकादेखील २५ मिनिटे या वाहतूक कोंडीत अडकली. याचा त्रास लोकांना होत असल्याने संबंधित विभागाला स्थळ बदलण्याची मागणी करावी, अशी सूचनादेखील पिंटो यांनी केली.

नगरसेवकाला मारल्याचा निषेध

नगरसेवक उदय मडकईकर यांनी नगरसेवकाला मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, ज्यांना पावती देऊन निधी गोळा करण्याचा अधिकार नाही ते नगरसेवक तेथे का जातात, हा प्रश्न प्रथम उद्भवतो. हा निधी गोळा करताना नगरसेवकाने निरीक्षकाला सोबत नेणे महत्त्वाचे आहे.

कंत्राटदाराविरोधात न्यायालयात जाणार

स्मार्ट सिटीचे काम खालच्या दर्जाचे झाल्याने मी स्वतः न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे उदय मडकईकर यांनी सांगितले. माहिती हक्क कायद्यांतर्गत मी माहिती मागितल्याने त्यासाठी काही महिने लागणार आहेत. ती माहिती मिळाल्यावर लगेच न्यायालयात मी याचिका दाखल करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT