Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: ठरलं! खासदारांना कुठल्या कार्यक्रमांचे आमंत्रण द्यायचे याबाबत राज्य सरकारचे परिपत्रक

केंद्रीय मंत्री खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली होती नाराजी

Akshay Nirmale

Goa Government: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिनी दोना पावला जेटीचे नुतणीकरणानंतर उद्घाटन झाले होते. या कार्यक्रमासाठी आमंत्रण न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत साधा उल्‍लेखही नसल्‍यावरून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी उघडपणे संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर आता राज्य सरकारने कोणत्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे याबाबत एक परिपत्रकच काढले आहे.

राज्य सरकारच्या या नव्या परिपत्रकानुसार एखादे काम जर राज्य सरकारच्या निधीतून झालेला असेल तर त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना निमंत्रण देणे बंधनकारक असेल. तर एखाद्या कामासाठी केंद्राकडून निधी मिळालेला असेल तर त्या कार्यक्रमाला खासदारांना बोलावणे बंधनकारक असेल.

याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे. उच्च अधिकाऱ्यांचे यावर लक्ष राहणार आहे. खा. श्रीपाद नाईक यांना दोना पावला जेटीच्या उद्घाटनाला आमंत्रण न दिल्यावरून झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दोना पावला जेटीच्या उद्घाटनानंतर श्रीपाद नाईक म्हणाले होते की, खासदाराला निमंत्रण न देणे हे शिष्‍टाचाराच्‍या कोणत्‍या तत्‍वात बसते ?या प्रकरणी मुख्यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री खंवटे यांनी लक्ष घालावे.

या प्रकारानंतर पर्यटनमंत्री खंवटे यांनी माफीही मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT