Global Konkani Forum Dainik Gomantak
गोवा

Global Konkani Forum: दत्ता नायकांच्‍या प्रस्‍तावाला उदय भेंब्रे यांचा विरोध का? ग्‍लोबल कोकणी फोरमने घेतला समाचार

Datta Damodar Nayak vs Uday Bhembre: गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात झालेल्‍या चर्चेवेळी दत्ता नायक यांनी राजभाषा कायदा सर्वसमावेशक करण्‍यास काहीच हरकत नाही अशी भूमिका मांडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कोकणी समाज एकत्र येण्‍याबरोबरच भाषावादाला कायमची मूठमाती देण्‍यासाठी रोमी लिपी आणि मराठी या दोन्‍ही भाषांना राजभाषा कायद्यात स्‍थान द्या, असा प्रस्‍ताव विचारवंत दत्ता दामोदर नायक यांनी मांडल्‍यावर उदय भेंब्रे यांनी त्‍यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर रोमीवर आजवर झालेला अन्‍याय दूर करण्‍यासाठी दत्ता नायक यांनी जो प्रस्‍ताव पुढे आणला आहे, त्‍यास भेंब्रे यांचा विरोध का? असा सवाल करत ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ने घेतलेल्‍या भूमिकेचेही रोमीचा पुरस्‍कार करणाऱ्या ग्‍लोबल कोकणी फोरमने स्‍वागत केले आहे.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात झालेल्‍या चर्चेवेळी दत्ता नायक यांनी राजभाषा कायदा सर्वसमावेशक करण्‍यास काहीच हरकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्‍यास आक्षेप घेताना उदय भेंब्रे यांनी ‘दत्ता नायक यांची भूमिका तत्‍वशून्‍यतेची’ असे म्‍हटले होते. त्‍याला उत्तर देताना नायक यांनी ‘भेंब्रे यांची भूमिका भाषिक मूलतत्त्ववादी असे म्‍हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर ग्‍लोबल कोकणी फोरमने आपली भूमिका मांडताना म्‍हटले आहे की, ओपिनियन पोल आणि राजभाषा या दोन्‍ही आंदोलनांमध्‍ये कॅथलिक समाज आघाडीवर राहिल्‍यामुळेच गोवा वेगळा राहिला. त्‍यामुळे कोकणी राजभाषा झाली.

परिणामी १९८७ साली झालेल्‍या राजभाषा कायद्यात रोमीला स्‍थान नसल्‍यामुळे आपल्‍यावर अन्‍याय झाला ही भावना कॅथलिक समाजामध्‍ये रुजली. दत्ता नायक यांनी तेच म्‍हटले आहे. कॅथलिक समाजावर झालेला अन्‍याय दूर व्‍हावा असे भेंब्रे यांना का वाटत नाही? असा सवालही फोरमने केला आहे.

‘या’ प्रश्‍‍नाचे उत्तर भेंब्रे यांनी द्यावे

१९८७ साली राजभाषा कायदा संमत करताना किमान २५ वर्षांसाठी रोमी लिपीचा वापर सुरू ठेवावा अशी दुरुस्‍ती आपण सुचवली होती, असे उदय भेंब्रे म्‍हणतात. तर, आता त्‍यांना रोमीला राजभाषा कायद्यात स्‍थान मिळाल्‍यास आणि शाळेतील अभ्‍यासक्रमात रोमी कोकणीचा वापर झाल्‍यास ते का नको आहे? याचे उत्तर भेंब्रे यांनी द्यावे अशी मागणी ग्‍लोबल कोकणी फोरमने केली आहे.

५३ ग्रामसभांनी संमत केला आहे ठराव

गोव्‍यातील ५३ ग्रामसभांनी राजभाषा कायद्यात रोमीला स्‍थान मिळावे अशा आशयाचा ठराव घेतला आहे. त्‍यावेळी या ठरावाला त्‍या ग्रामसभांना उपस्‍थित असलेल्‍या एकाही हिंदूधर्मीय सदस्‍याने हरकत घेतली नाही. गोवा हे राज्‍य नेहमीच सामाजिक सलोख्‍यासाठी प्रसिद्ध राहिले आहे. अशा परिस्‍थितीत रोमीला राजभाषा कायद्यात स्‍थान मिळाले तर भेंब्रे आणि अन्‍य देवनागरी गोटातील नेत्‍यांना ते का मान्‍य नाही? असाही सवाल ग्‍लोबल कोकणी फोरमने विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT