Mapusa Police news Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: हळदोणा येथे एकाला कुटंबासह जीवे मारण्याची धमकी; पुण्यातील तिघांना अटक, पंचायत सदस्य फरार

म्हापसा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Akshay Nirmale

Mapusa Police News: हळदोणातील एकाला त्याच्या कुटूंबासमवेत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित आणि हळदोणा पंचायत सदस्य फरार झाल्याची माहिती आहे. म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी याबाबत माहिती दिली.

हळदोणा, बार्देश येथील रहिवाशी स्वप्नील पेडणेकर (वय 23 वर्ष) यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले होते की, पेडणेकर यांना पूर्ववैमनस्यातून या तिघांनी कारमधून अज्ञात स्थळी नेले. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली.

दक्षेश कुरपे (वय 22), विकी कारंडे (वय 22 वर्ष) आणि सूरज यादव (वय 22 वर्ष) यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व पूणे (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहेत. हे तिघेही मुख्य आरोपी प्रणेश नाईक याच्याकडे काम करतात. प्रणेश नाईक हे हळदोणा पंचायतीचे सदस्य आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघांवर पोलिसांनी कलम 342, 323, 506 (ii) R/w 34 IPC अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसडीपीओ मापुसा जिवबा दळवी आणि एसपी उत्तर निधी वलसन यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT