Goa Accident | Anand Vishwakarma death  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भावाला भेटण्यासाठी यूपीतून गोव्यात आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचा मृत्यू; प्राण्याला वाचवताना दुचाकीचा अपघात

उत्तर प्रदेशातील गावावर शोककळा

Akshay Nirmale

Goa Accident: गोव्यात सुट्टीसाठी आलेल्या भाजप युवा मोर्चाचे उत्तर प्रदेशातील नेते आनंद विश्वकर्मा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून दुचाकीवरून जाताना जनावर आडवे आल्याने त्यांची दुचाकी घसरली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आनंद विश्वकर्मा (28) हे उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील सराया हलिमाबाद येथील रहिवासी होते. ते भाजयुमोचे जिल्हा मंत्री होते.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

2 जून रोजी आनंद सुट्टीसाठी आणि मोठ्या भावाला भेटण्यासाठी गोव्यात आले होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये सन्नाटा पसरला. त्यांच्या उत्तर प्रदेशातील निवासस्थानाबाहेर समर्थक आणि चाहत्यांनी गर्दी केली होती.

संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. विश्वकर्मा हे कर्हा येथे कोचिंग सेंटर चालवत होते.

शुक्रवारी, २ जून रोजी दुपारी मित्रासोबत दुचाकीवरून खरेदीसाठी जात असताना बाईकसमोर अचानक एक प्राणी आला.

ब्रेक मारूनही दुचाकी जनावरावर आदळली आणि घसरली. या अपघातात आनंद गंभीर जखमी झाला.

स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच आनंद यांचा मोठा भाऊ हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तथापि, उपचारादरम्यान आनंद यांचा मृत्यू झाला. चार भावंडांमध्ये आनंद सर्वात लहान होता. त्याचे लग्न झालेले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT