Husband shot dead his wife in Goa Agonda Dainik Gomantak
गोवा

Half Cut Dead body Found : म्हादई नदीत सापडला अर्धा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह, भिरोंडा सत्तरी परिसरात खळबळ

वाळपई पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Rajat Sawant

भिरोंडा सत्तरी येथे एक अर्धा कापलेला मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून वाळपई पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा मृतदेह भिरोंडा सत्तरी येथे म्हादई नदीत आढळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिरोंडा सत्तरी येथे म्हादई नदीत अर्धा कापलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच वाळपई पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीतून मृतदेह बाहेर काढत ताब्यात घेतला. मृतदेहाचा वाळपई पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही आहे.

दरम्यान अशीच एक मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी म्हापसा येथील नवीन बसस्थानकाच्या जवळील खुल्या शेतजमिनीत उघडकीस आली होती. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले होते.  या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात संशयितांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

नबीन बी. के. (32) या नेपाळी तरुणाचा गळ्यात फुटलेली बाटली घुसवून खून करण्यात आला. नबीन हा ‘टफ सिक्योरिटी’ या सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीचा कामगार आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT