माजी मंत्री दयानंद मांद्रेकर Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसमधील शिस्त व नेतृत्व अभावामुळेच पक्षांतरे - मांद्रेकर

कॉंग्रेसच्या 18 बंडखोर आमदारांनी आतापर्यंत पक्षांतर करून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली : 2017 पासून विधानसभेच्या सलग दोन निवडणुकानंतर कॉंग्रेसच्या 18 बंडखोर आमदारांनी आतापर्यंत पक्षांतर करून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रकार किळसवाणा असून लोकांमध्ये नाराजी वाढत आहे, अशी टीका माजी आमदार तथा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केली.

कॉंग्रेसमध्ये शिस्त आणि नेतृत्वाचा अभाव असल्यानेच असे प्रकार घडतात. मी माझ्या पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक असून स्थानिक मंडळाच्या सदस्य पदापासून ते राज्य कार्यकारिणीचा उपाध्यक्ष आणि आमदार पदापासून ते मंत्रिपदाचा कार्यभार समर्थपणे निभावलेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत होणाऱ्या पक्षांतरामुळे माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही.

मी माझ्या जीवनात समाधानी आहे. 2007 नंतर सलग पाच वर्षे एकूण 14 आमदारांचे संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षाची भूमिका तटस्थपणे निभावल्यानेच 2012 सालच्या निवडणुकीत जनतेने भाजचे एकवीस आमदार निवडून देत स्पष्ट बहुमत दिले होते. त्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. पण सध्याच्या पक्षांतराबद्दल मला काही बोलायचे नाही. परंतु योग्य वेळी सूज्ञ जनता पक्षांतरे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT